NCP agitation in Nashik Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

शिंदे सरकार म्हणजे, “गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी”

नाशिकमध्ये आश्वासनाचे विमान उडवून युवक राष्ट्रवादीचे जोरदार आंदोलन

Sampat Devgire

नाशिक : वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प, (FOXCON) एअरबस-टाटा, (Tata Airbus) सॅफ्रन प्रकल्प यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (NCP) शहराध्यक्ष अंबादास खैरे (Amabadas Khaire) यांच्या नेतृत्वाखाली आश्वासनाचे विमान उडवून राज्य सरकारविरोधात (Maharashtra Givernment) जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी “खोके सरकारचा निषेध असो”, “उद्योगाचे विमान गुजरातला, बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला”, “गुजरात तुपाशी, महाराष्ट्र उपाशी” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. (NCP Youth wing agitation on Industrial project shifting from Maharashtra)

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे राज्य शासनाचा निषेध केला. राज्यातील युवकांसाठी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन प्रत्यक्षात केंद्र सरकार त्यात अपयशी ठरेल आहे. राज्य शासन याबाबत निष्क्रीय असल्याने त्यांच्या काळात प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याची टिका करण्यात आली.

महाराष्ट्रातील अनेक उद्योग, सरकारी कार्यलाये आणि प्रस्तावित प्रकल्प आयत्यावेळेला गुजरातला हलवण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. गेल्या काही दिवसात सर्वप्रथम वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला गेला. त्यानंतर एअरबस-टाटा सी-२९५ लष्करी वाहतूक विमान हा प्रकल्प सुद्धा गुजरातला गेला. यानंतर सॅफ्रन विमान इंजिन दुरुस्ती देखभालीचा प्रकल्प नागपूर येथे येणार होता तोही हैदराबादला हलविण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे राज्यातील उद्योग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जात असल्याने अब्जावधीची गुंतवणुकीवरुन राज्याला पाणी फिरवावे लागले आहे. वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प, एअरबस-टाटा, सॅफ्रन प्रकल्प यासारख्या अब्जावधी रकमेच्या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात लाखो तरुणांना रोजगारनिर्मिती होणार होती. परंतु तसे न झाल्याने महाराष्ट्राची अधोगती होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या आडमुठेपणामुळे अनेक मोठे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेल्याने महाराष्ट्रातील तरूण बेरोजगारीच्या उंबरठ्यावर उभा आहे. याचा निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांच्या प्रतिमेचे कागदी विमान बनवून उडविले.

यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, निखिल भागवत, डॉ संदीप चव्हाण, निलेश भंदुरे, विशाल डोके, सागर बेदरकर, सोनू वायकर, अमोल नाईक, संतोष भुजबळ, जाणू नवले, सुनील घुगे, जितेंद्र जाधव, हर्षल चव्हाण, अजय बागुल, संजय सौदे, विशाल गुंजाळ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील वातावरण व इतर बाबींचा विचार करता उद्योगपती प्रथमतः महाराष्ट्र राज्याला प्राधान्य देतात. परंतु सत्तेच्या हव्यासापोटी खोके सरकारने राज्यातील वातावरण गढूळ केल्याने तसेच महाराष्ट्राची भाकरी खाऊन गुजरातची चाकरी करत असल्याने महाराष्ट्राचे उद्योगधंदे गुजरातला पळविले जात आहे. – अंबादास खैरे

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT