Chimnrao Patil
Chimnrao Patil  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

"राजकीय डावपेच संपले; सरकारला राजीनामा द्यावा लागेल" : बंडखोर चिमणराव पाटील

कैलास शिंदे :सरकारनामा ब्युरो

जळगाव : सध्या आकड्यांचा राजकीय खेळ आटोपला आहे. राजकीय डावपेच संपले आहेत. बहुमत आमच्या बाजूने आहे. त्यामुळे आता केवळ न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर आम्ही मुंबईत येवू. आमचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया होईल असा विश्‍वास शिवसेनेचे बंडखोर आमदार चिमणराव पाटील यांनी गुवहाटी येथून ‘सरकारनामा’शी बोलतांना व्यक्त केला.

जळगाव जिल्ह्यातील तब्बल ५ आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटात भाग घेतला आहे. यात पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार किशोर पाटील, आमदार लता सोनवणे तसेच शिवसेना पुरस्कृत अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी बंडखोरी केली आहे. सद्य स्थितीत हे सर्व आमदार आसाम राज्यातील गुवहाटी येथील रेडीसन ब्लू या पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत.

सरकार अल्पमतात,राजीनामा द्यावा लागणार :

आमदार चिमणराव पाटील पुढे म्हणाले, एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली आमचे संख्याबळ पुर्ण झाले आहे. आता राज्यातील महाविकास सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे सरकारला राजीनामा द्यावा लागणार आहे.

मंत्रीपदाचा वाद मला माहिती नाही :

जळगाव जिल्ह्यातील २ आमदारांच्या मंत्रीपदावरून वाद झाला अशा बातम्या कालपासून येत होत्या. मात्र याबाबत बोलतांना आमदार चिमणराव पाटील म्हणाले, कसला वाद मला माहिती नाही, माझा तर असा कोणताही वाद झाला नाही, इथे तसा कोणता वाद झाल्याचे मला माहिती नाही. सद्या या ठिकाणी एकदम चांगले वातावरण आहे.

शिंदेच्या मुख्यमंत्री प्रस्तावावर खुलासा नाही :

बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करा असा प्रस्ताव बंडखोर आमदारातर्फे देण्यात आल्याच्या वृत्ताबाबत विचारले असता, आमदार चिमणराव पाटील यांनी या प्रस्तावाबाबत मात्र काहीही सांगितले नाही, त्यांनी त्यावर फारसा खुलासाही केला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT