Ratan Tata Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ratan Tata News : रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार!

Sampat Devgire

Award to Ratan Tata : महाराष्ट्र शासनाने यंदाच्या वर्षापासून उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पहिला मानाचा पुरस्कार उद्योगपती, टाटा समूहाचे प्रमुख रतन टाटा यांना देण्यात येणार आहे. (Maharashtra Government`s first Udyogratna award will given to Ratan Tata)

राज्याचे (Maharashtra) उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज विधान परिषदेत याबाबत माहिती दिली. महाराष्ट्र भूषण दर्जाचा हा पुरस्कार देण्याचा निर्णय झाला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बुधवारी बैठक झाली. या बैठकीत याबाबतचा निर्णय झाला. त्यात उद्योगरत्न पुरस्कार यंदापासून देण्यात येणार आहे. हा राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार असेल. पहिला पुरस्कार टाटा उद्योग समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांना देण्यात येईल. याशिवाय महिला, मराठी उदयोजक व अन्य एका उद्योजकाला असे तीन पुरसकार देण्यात येतील, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

यावेळी विविध सदस्यांच्या सुचनांचा उल्लेख करून मंत्री सामंत यांनी महाराष्ट्र हे परदेशी गुंतवणुकीत देशात पहिल्या स्थानावरच आहे. मधल्या काळाचा उल्लेख मी करणार नाही, परंतु स्टेट बँक ऑफ इंडियाने केलेल्या सर्व्हेक्षणात राज्य पहिल्या स्थानावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात मंत्रीमंडल उपसमितीच्या गेल्या तीन बैठकांमध्ये १.१८ लाख कोटींची गुंतवणूक झाली असून त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती झाल्याचेही ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT