Jalgaon Nagar palika Election Result 2025: जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, मुक्ताईनगर , अमळनेर फैजपूर, धरणगाव, सावदा, जामनेर, यावल, भुसावळ, वरणगाव, नशिराबाद, शेंदुर्णी, रावेर, एरंडोल यासह १८ नगरपरिषदाच्या निवडणुकीचे निकाल लागले. यात अनेक बड्या नेत्यांना मतदारांना धक्का दि मतदान झाले होते. आजच्या मतमोजणी धक्कादायक निकाल समोर आले आहेत.
जिल्ह्यात राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात मतदारांनी मोठा धक्का दिला आहे. आगामी काळातली जिल्हा परिषद, महापालिका निवडणुकीत त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवडणुकीत भुसावळ नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. अवघ्या 1847 मतांनी त्यांचा पराभव झाला. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या गायत्री भंगाळे निवडून आल्या आहेत.
रजनी सावकारे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा भुसावलमध्ये झाली होती. या सभेनंतरही रजनी सावकारे यांचा पराभव झाला. भुसावलचे नगराध्यक्षपद हे अनुसूचित जाती महिला (एससी) या प्रवर्गासाठी राखीव होते. या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रजनी सावकारे यांना नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी देण्यात आली. या निर्णयावर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात आली. घराणेशाही आणि सत्तेचा गैरवापर असे आरोप करत विरोधकांनी हा मुद्दा निवडणूक प्रचारात सातत्याने लावून धरला.
मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघातील धरणगाव नगरपालिकेत शहर विकास आघाडीच्या लीलाबाई चौधरी विजयी झाल्या असून शिंदे सेनेच्या वैशाली भावे यांना पराभव पत्करावा लागला आहे. धरणगाव नगरपरिषदेत ११ प्रभाग असून नगराध्यक्ष आणि २३ नगरसेवक अशी २४ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. मात्र या निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडी शहर आघाडीने शिंदेसेनेला धक्का दिला आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीतही गुलाबराव पाटील यांच्यासमोर तगडे आव्हान नसताना विरोधकांनी त्यांना घाम फोडला होता. आता नगरपालिका निवडणुकीत झालेल्या या पराभवामुळे गुलाबराव पाटील यांची स्थानिक पकड सैल होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठा हादरा बसला आहे. मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसे यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या भाजपला या निवडणुकीत मोठा पराभव झाला आहे. शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) संजना पाटील यांनी मुक्ताईनगर नगरपंचायतीवर भगवा फडकवला आहे.
संजना पाटील या स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांनी 2,000 हून अधिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.मतदारांनी दिलेल्या कौल रक्षा खडसे यांनी नम्रपणे स्वीकार आहे. 'मी या निवडणुकीची पूर्ण जबाबदारी घेतली होती, त्यामुळे हा पराभवही माझाच आहे, असे रक्षा खडसे यांनी सांगितले. त्यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर 'दडपशाही'चा गंभीर आरोप केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.