Satish Patil Gulabrao Deokar Join Ajit-Pawar NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

NCP Jalgaon Politics: दोन माजी मंत्र्यांमुळे अजितदादांची जळगावात ताकद वाढणार; देवकर, पाटलांसह अनेकांचा ‘राष्ट्रवादी’त प्रवेश

Satish Patil Gulabrao Deokar Join Ajit-Pawar NCP: नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ आल्याचे पाहायला मिळत आहे.

सरकारनामा ब्यूरो

देविदास वाणी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ३) मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे अजित पवारांच्या पक्षाची जळगाव जिल्ह्यातील ताकद वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला खिंडार पडल्याचे बोलले जात आहे.

सत्ताधारी पक्षात असायला हवे..

नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला जळगाव जिल्ह्यात मोठ्या अपयशाला सामोरे जावे लागल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठी मरगळ आल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागते की काय,अशी परिस्थिती असल्याने अनेक कार्यकर्त्यांना आपण सत्ताधारी पक्षात असायला हवे, अशी भावना प्रवेश करणाऱ्यांची आहे. 

आज मुंबईत प्रवेश घेतलेल्यांमध्ये चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, माजी आमदार दिलीप सोनवणे, महिला अध्यक्षा तिलोत्तमा पाटील, ‘जेडीसीसी’चे संचालक नाना पाटील, मजूर फेडरेशनचे सभापती रोहिदास पाटील, माजी सभापती लिलाधर तायडे यासह अनेक राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते, अनेक गावचे सरपंच, बाजार समितीचे संचालक आदींचा समावेश आहे.

प्रवेशावेळी आमदार अनिल भाईदास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार, अध्यक्ष उमेश नेमाडे, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.गेल्या २९ एप्रिलला माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांचा मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश निश्‍चित झाला होता. तेव्हापासून जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पक्षांतर्गत नाराजी आणि गटातटाचं राजकारण यामुळे ही फूट झाल्याचे बोलले जात आहे.

डॉ. सतीश पाटील हे जळगाव बडे नेते मानले जातात. गुलाबराव देवकर यांचाही स्थानिक राजकारणात चांगला दबदबा आहे. या नेत्यांचा शरद पवार यांच्या गटातून बाहेर पडणे, म्हणजे उत्तर महाराष्ट्रात शरद पवार यांचं नेतृत्व डळमळीत होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT