जळगाव : ''भारतीय जनता पक्षाच्या काळात माझ्यावर आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे, ज्यांनी मला त्रास दिला त्यांचे काय करायचे हे जनतेच्या न्यायालयात जनताच ठरवेल,'' असे मत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
छगन भुजबळआज जळगाव येथे आहेत. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ''दिल्लीच्या महाराष्ट्र सदन बांधकाम प्रकरणात झालेल्या आरोपातून न्यायालयाने मला निर्दोष मुक्त केले आहे. त्यामध्ये न्यायालयाने असे म्हटले आहे, की त्यात कोणतीही अनिमितता तसेच कोणतीही अयोग्य गोष्ट झालेली नाही. त्यामुळे आता हे सिद्ध झाले आहे की, महाराष्ट्र सदन बांधकाम हे नियमानुसार झालेले आहे, कॅबिनेटच्या मंजुरीनुसार झालेले आहे. भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा त्यात कुठेही सहभाग नाही.''
ज्या व्यक्तींनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याबाबत काय ? असा प्रश्न विचारला असता भुजबळ म्हणाले, ''माझ्याकडे ओबीसी समाज, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनतेची खूप कामे आहेत, त्यामुळे ज्यांनी मला त्रास दिला, त्यांच्या बद्दल माझ्या मनात कोणताही राग नाही. जनेतेच्या न्यायालयात जनताच ठरवेल त्यांचे काय करायचे.''
''माझ्या कठीण प्रसंगाच्या या कालखंडात माझा पक्ष तसेच पक्षाचे नेते शरद पवार (Sharad Pawar) माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यांना विश्वास होता मी निर्दोष आहे, त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळात पहिल्याच यादीत मला मंत्रिपदाची संधी दिली, एवढेच नव्हे तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही विश्वास दाखविला. विरोधी पक्ष म्हणून जरा अशा रीतीने कुणाला त्रास देत असतील तर त्यांचे काय करायचे हे जनतेचे न्यायालय ठरवेल,'' असे भुजबळ म्हणाले
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.