Eknath Shinde, Manoj Jarange Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : 'तू बिनधास्त लढ संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी'; जरांगे पाटलांचा शिंदेंच्या 'या' उमेदवाराला पाठिंबा?

Maharashtra Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीदेखील अद्याप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. ते कोणाला पाठिंबा देणार हे गुरूवारी (ता.31) बैठकीनंतर जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

Jagdish Patil

Nandgaon Assembly Election 2024 : विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस उरले आहेत. तरीदेखील अद्याप मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही.

शिवाय आपण कोणाला पाठिंबा देणार हे गुरूवारी (ता.31) बैठकीनंतर जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मात्र, अशातच नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी जरांगे पाटलांची भेट घेतली.

या भेटीनंतर त्यांनी 'तू बिनधास्त लढ संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी आहे.' असं जरांगे यांनी म्हटल्याचं सांगितलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी कांदेंना पाठिंबा दिल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

जरांगेंच्या भेटीनंतर सुहास कांदे नेमकं काय म्हणाले?

सुहास कांदे (Suhas Kande) म्हणाले, "मी मनोजदादांच्या तब्येतीची विचारपूस केली. नांदगाव विधानसभा मतदारसंघातील कामाबाबत त्यांना सांगितलं. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी शिवसृष्टी उभारली आहे. त्याला पुष्पहार अर्पन करण्यासाठी यावं, असं त्यांना मी सांगितलं. त्यांनी देखील येण्याचं आश्वासन दिलं. तर यावेळी ते मला म्हणाले, 'तू बिनधास्त लढ, संपूर्ण समाज तुझ्या पाठीशी राहिल."

जरागें पाटलांचं स्पष्टीकरण

सुहास कांदेना पाठिंबा दिल्याच्या चर्चांवर जरांगे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आपण कोणालाही पाठिंबा दिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जरांगे म्हणाले, "मी कोणालाही पाठिंबा वगैरे काही दिलेला नाही. आमची बैठक झाल्यानंतरच आमचा निर्णय होणार आहे हे आख्या महाराष्ट्राला माहिती आहे. मी एकालाही पाठिंबा दिलेला नाही."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT