Samata parishad followers at yeola
Samata parishad followers at yeola Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

OBC Census In Maharashtra: स्वतंत्र गणनेसाठी समता परिषद झाली आक्रमक!

Sampat Devgire

येवला : (Yeola) बिहारमध्ये स्वतंत्रपणे जातीनिहाय जनगणना (Census) सुरु झाली आहे. तमिळनाडू, छत्तीसगड आणि इतर अनेक राज्यांनी सुद्धा ओबीसी (OBC) जनगणना केल्या आहेत. महाराष्ट्रातही (maharashtra) जातीनिहाय जनगणना करावी अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने (Samata parishad) केली आहे. (Samata parishad followers aggressive on OBC census in maharashtra)

तहसीलदार प्रमोद हिले यांना या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्रित जमा होत ‘जय ज्योती जय क्रांती, भुजबळ साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ है, ओबीसींची स्वतंत्र जनगणना झालीच पाहिजे’ अशा घोषणा दिल्या.

गेल्या कित्येक वर्षांपासूनची ही मागणी प्रलंबित आहे. जनगणना हा विषय केंद्र शासनाशी संबंधित आहे. मात्र इतर मागासवर्गियांची स्वतंत्र जनगणना करण्यासाठी केंद्र सरकारने असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य शासनाने बिहार सरकारप्रमाणे ओबीसींची स्वतंत्र जनगणना करावी असेही परिषदेने म्हटले आहे.

देशातील अनुसूचित जाती व जमातींची जातवार जनगणना करून दीडशे वर्षे होत आलेली आहेत. स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने फक्त अनुसूचित जाती व जमाती यांची जातीनिहाय तर इतर सर्वांची एकत्रित गणना करण्याचे धोरण स्वीकारले. यातून मागासवर्गीय ओबीसी वंचित राहिले. १९९४ मध्ये केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाने ओबीसी जनगणना कशी आवश्यक आहे, ते सरकारला तिसऱ्यादा पटवून दिले. ५ मे २०१० ला संसदेत राष्ट्रवादीचे नाशिकचे तत्कालीन संसद सदस्य समीर भुजबळ, माजी मंत्री स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्यासह १०० खासदारांनी ओबीसी जनगणनेचा ठराव केला. त्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्वत: शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय प्रयत्न केले होते. त्यातून २०११ ते २०१४ मध्ये केंद्राने सामाजिक व आर्थिक जातगणना केली. मात्र त्याची आकडेवारी राज्यांना दिली नाही.

देशात २०२१ च्या नियमित जनगनणेचे काम अद्याप व्हायचे आहे. त्यात ही जातीनिहाय गणना करावी अशी सातत्याने मागणी केली आहे. निवेदन देताना भुजबळांचे स्वीय सहाय्यक बाळासाहेब लोखंडे, युवा नेते मकरंद सोनवणे, राधाकिसन सोनवणे, समता परिषदेचे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख संतोष खैरनार, डॉ. मोहन शेलार, तालुकाध्यक्ष प्रवीण बुल्हे, शहराध्यक्ष भूषण लाघवे, सचिन कळमकर, येमको संचालक चंद्रकांत कासार, सुभाष गांगुर्डे, विजय खोकले, विजय खैरनार, प्रवीण पहिलवान, गोटू मांजरे, सचिन सोनवणे, विक्की बिवाल, गणेश गवळी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT