Nashik : Gram Panchyat Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; सात ग्रामपंचायती जिंकल्या

एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन होलिन, परिवर्तन पॅनलचे सागर बारमाटे यांना समान मते मिळाली . त्या चिट्ठी काढून निवड करण्यात आली. त्यात सचिन होलीन हे विजयी झाले आहेत.

सरकारनामा ब्यूरो

नाशिक : नाशिक (Nashik) तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींपैकी (Gram Panchyat) सात गावच्या सरपंचदाच्या निवडणुकीत (Election) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) वर्चस्व मिळविले आहे. त्यात शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सर्वाधिक पाच ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. प्रत्येकी दोन ग्रामपंचायती भाजप, शिंदे गट आणि अपक्षांनी जिंकल्या आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी एक ग्रामपंचायत जिंकता आली आहे. (Mahavikas Aghadi dominated in Nashik; Seven gram panchayats were won)

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायत निकालात भाजपने २, शिवसेना उद्धव ठाकरे गट ५, शिंदे गट २, काँग्रेस १ राष्ट्रवादी काँग्रेस १, अपक्ष २ अशा एकुण १३ ग्रामपंचायतींचा निकाल हाती आला आहे. यामध्ये महाविकास आघाडीने १३ सरपंचांपैकी ७ ग्रामपंचायतींवर कब्जा केला आहे.

दरम्यान, एकलहरे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामविकास पॅनलचे सचिन होलिन, परिवर्तन पॅनलचे सागर बारमाटे यांना समान मते मिळाली आहेत. त्या चिट्ठी काढून निवड करण्यात आली. त्यात सचिन होलीन हे विजयी झाले आहेत.

नाशिक तालुक्यातील ग्रामपंचायतींचा निकाल पुढीलप्रमाणे

1 किरण कोरडे-गिरनारे-शिंदे गट

2 कचरू वागळे- महीरावणी- शिंदे गट

3 मालती डहाळे-गणेशगाव-ठाकरे गट

4 रवींद्र निंबेकर-तळेगाव-ठाकरे गट

5 अगस्ति फडोळ-यशवंतनगर-भाजप

6 शरद मांडे- बेलगावढगा-अपक्ष

7 कविता जगताप-सामनगाव-ठाकरे गट

8 पर्वता पिंपळके-देवरगाव-काँग्रेस

9 प्रिया पेखळे-ओढा-ठाकरे गट

10 लेखा कळाले-लाडची-अपक्ष

11 एकनाथ बेझेकर-दुडगाव-ठाकरे गट

12 अरुण दुशिंग-एकलहरे-भाजप

13 सुरेश पारधे-साडगाव-राष्ट्रवादी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT