Uddhav Thackeray News, Bhagat singh koshyari News, Maharashtra Political Crisis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

उद्धव ठाकरे सरकारचा फैसला उद्याच, राज्यपालांचे आदेश!

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी बहुमत चाचणी करण्याचे आदेश दिले.

Sampat Devgire

मुंबई : राज्यात (Maharashtra) गेले आठ दिवस सुरु असलेल्या राजकीय अस्थिरतेला आज गंभीर वळण मिळाले. काल भाजपच्या (BJP) नेत्यांच्या भेटीनंतर आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshiyari) यांनी सरकारला (Mahavikas Aghadi) उद्या (ता.३०) विशेष अधिवेशन घेऊन बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. (Uddhav Thakre Government will have to prove majority Tommarow)

दरम्यान याबाबत महाविकास आघाडी सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे संकेत आज आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांनी दिले. याबाबत माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी याबाबत कायदेशीर मुद्दे निर्माण झाले आहेत, असे सांगितले.(Bhagat singh koshyari News)

मंगळवारी भाजप नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव देणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर या घडामोडींचा अंदाज आला होता. भाजपने कालच सर्व आमदारांना विमान व विशेष गाड्यांनी मुंबईत दाखल होण्याच्या सुचना दिल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी आज उद्या (ता.३०) सकाळी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्याचे आदेश विधीमंडळ सचिवांना दिले आहेत. सायंकाळी पाच पर्यंत बुहमत चाचणी घ्यावी. त्यात आवाजी मतदान घेऊ नये. प्रत्येक आमदारांचे मतदान घ्यावे व त्याची मोजणी करावी. विधानसभा बरखास्त करण्याचा प्रयत्न करू नये असे देखील राज्यपालांनी बजावले.

दरम्यान गेले आठ दिवस गुवाहाटी येथे असलेले शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे तसेच सर्व आमदार उद्या सकाळी गुवाहाटी येथून मुंबईत दाखल होत आहेत. त्यापूर्वी ते कामाख्या देवीचे दर्शन घेतील. आज विजय शिवतारे देखील त्यांच्या गटात गेले. ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची विनंती करणार आहेत.

....

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT