Eknath Khadse
Eknath Khadse Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दूध संघ निवडणूकीत एकनाथ खडसे अद्यापही स्ट्राँगच!

Sampat Devgire

जळगाव : जिल्हा (Jalgaon) सहकारी दूध संघाच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडे (Mahavikas Aghadi) अद्यापही ३२ उमेदवार आहेत. लवकरच २० उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती आघाडीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दिली. आघाडीच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. (Mahavikas Aghadi leaders meeting on Election of Milk mederation)

आदर्शनगर येथील ॲड. रोहिणी खडसे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी विविध उमेदवार तसेच नेते उपस्थित होते. यंदाच्या निवडणुकीत चुरशीचे वातावरण असल्याचे यावेळी स्पष्ट झाले.

जिल्हा दूध संघाच्या अध्यक्षा मंदाकिनी खडसे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष गुलाबराव देवकर, माजी आमदार डॉ. सतीश पाटील, आमदार अनिल भाईदास पाटील, वाल्मीक पाटील, महापौर जयश्री महाजन, महापालिकेतील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, संजीव पाटील, इंदिरा पाटील, विजय पाटील आदी नेत्यांनी यावेळी विविध सुचना केल्या.

आमदार एकनाथ खडसे म्हणाले, की उमेदवार निश्‍चितीबाबत चर्चा करण्यात आली. २० जागांसाठी आमच्याकडे ३२ उमेदवार इच्छुक आहेत. काही मतदारसंघात तीन ते चार जण इच्छुक आहेत. एसटी मतदारसंघात अधिक उमेदवार इच्छुक आहेत. त्याबाबतही निर्णय घेऊन उमेदवार निश्‍चित करण्यात येतील. याशिवाय प्रचार करण्याबाबतही चर्चा झाली.

मतदारांचे मेळावे घेऊन त्यांच्या भेटी घेण्यात येतील. आम्ही आजही मतदारांच्या संपर्कात आहोत. आम्ही सात वर्षे दूध संघात केलेल्या कारभारावर मतदार विश्‍वास ठेवून आहे. विरोधी गटाने ‘खोके’ वापरले. मतदारांना ‘सहली’चे आमिष दाखविले, तरी दूध संघ चांगला कोण चालवू शकेल, हे मतदारांना माहिती आहे. त्यामुळे मतदार आमच्यावर विश्‍वास ठेवून मतदान करतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT