Mahendra More sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Jalgaon crime news : गोळीबारात जखमी भाजपच्या माजी नगरसेवकाचा मृत्यू

Former BJP corporator dies during treatment: महेंद्र मोरे यांच्यावर सात फेब्रुवारीला अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या महेंद्र यांना चाळीसगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

सरकारनामा ब्यूरो

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील चाळीगावमध्ये भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. मोरे या गोळीबारात गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना आज (शुक्रवारी) पहाटे त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Jalgaon crime news)

महेंद्र मोरे यांच्यावर सात फेब्रुवारीला अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. त्यात गंभीर जखमी झालेल्या महेंद्र यांना चाळीसगावमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारांना प्रतिसाद देत नसल्याने त्यांना तातडीने नाशिकमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

बाळू मोरे हे अपक्ष आणि भाजपच्या तिकाटीवर नगरसेवक राहिले आहेत. त्यांच्यावर गोळीबार झाला ती घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती. सीसीटीव्ही मोरे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांनी तोंड झाकले असल्याचे दिसून येत आहे. हल्ला कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलिस या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यामध्ये एकामागून एक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. भाजप आमदार भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात गोळीबार केला. तर, फेसबुक लाईव्ह दरम्यान ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांना गोळ्या घालण्यात आल्या. या प्रकरणानंतर विरोध आक्रमक झाले आहेत. राज्यात कायदा सुव्यवस्था नसल्याची टीका संजय राऊत यांनी केली असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा देण्याची मागणी केली आहे.

(Edited By Roshan More)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT