Malegaon News: मालेगाव महापालिकेची स्थापना होऊन २५ वर्ष झाली आहेत. मात्र या महापालिकेवर स्थानिक नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. हे शहर समस्यांनी त्रस्त बनल्याने तो आता राजकीय वादाचा विषय आहे.
मालेगाव महापालिकेच्या आयुक्त आणि प्रशासनावर स्थानिक राजकीय नेत्यांचे आरोप नवे नाहीत. `एमआयएम`चे आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांसह विविध नेत्यांनी महापालिके विरोधात सातत्याने गैरकारभाराचे आरोप केले आहेत.
आता मात्र मालेगाव विधायक कार्य समितीचे नेते निखिल पवार यांनी या विषयावर गंभीर आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. मालेगाव शहरातील वाहतूक कोंडी आणि प्रत्येक रस्त्याचे निकृष्ट काम यामुळे या शहराची समस्या गंभीर बनली आहे. त्याकडे त्यांनी थेट राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे लक्ष वेधले आहे.
निखिल पवार यांनी याबाबत राज्यपालांना निवेदन दिले आहे. गेल्या पंचवीस वर्षात शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढली. त्या तुलनेत महापालिकेकडून कोणतेही दूरदृष्टीचे प्रकल्प आणि कामे हाती घेण्यात आलेली नाही. त्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त आहेत.
मालेगाव शहरातील वाहतुकीची समस्या आणि वाहतूक कोंडी सातत्याने चर्चेचा विषय आहे. घरातील बहुतांश रस्ते अत्यंत निकृष्ट असल्याने प्रचंड खड्डे आहेत. त्यातून मार्ग क्रमांक करणे जीकिरीचे बनले आहे. त्यामुळे सातत्याने अपघातांच्या संख्येत वाढ झाल्याचे निवेदनात म्हटले आहे.
मालेगाव शहराला बाह्य वळण रस्ते तसेच रिंग रोड निर्माण करण्यात आलेले नाहीत. मुंबई आग्रा महामार्ग लगतच्या सर्विस रोडवर तसेच विकास आराखड्यातील रस्ते फुटपाथ, उड्डाणपूल, भूमिगत मार्ग आणि पादचारी पूल, पर्यायी रस्ते, वाहतुकीसाठी रस्त्यांचा विकास यापैकी काहीही महापालिकेने केलेले नाही.
मालेगाव शहराला या समस्येतून बाहेर काढण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बळकट करण्याची गरज आहे. वाहतुकीला पर्याय म्हणून अन्य उपक्रम आवश्यक आहेत. शहरातील वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर रस्ते रुंदीकरण आणि नव्या रस्त्यांची कामे हाती घ्यावी. त्यासाठी राज्यपालांनी या समस्येत व्यक्तिगत लक्ष घालून संबंधित यंत्रणांना सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे.
-------
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.