Malegaon Firing Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Firing : मालेगाव गोळीबार प्रकरणावरुन राजकारण पेटलं, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी 'एमआयएम'ला सुनावलं

Malegaon Firing MIM Vs NCP : माजी आमदार शेख यांनी 'एमआयएम'चे आमदार मुफ्ती यांना चांगलेच खडसावले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार मौलाना यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या.

Sampat Devgire

NCP Vs MIM News : महिन्याभरापूर्वी मालेगावचे माजी महापौर अब्दुल मलिक यांच्यावर गोळीबार झाला होता. या गोळीबाराचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसने 'एमआयएम'ला कडक शब्दात सुनावले आहे.

आमदार मौलाना मुफ्ती यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी आमदार आसिफ शेख यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या अटकेची मागणी देखील करण्यात आली होती.

या आरोपांचे पडसाद आता मालेगाव शहरात उमटू लागले आहेत. या संदर्भात माजी आमदार शेख यांनी 'एमआयएम'चे (MIM) आमदार मुफ्ती यांना चांगलेच खडसावले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आमदार मौलाना यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या. आमदार मौलाना यांनी आम्हाला बोलण्यास भाग पाडू नये. अन्यथा त्यांना उत्तरे देता येणार नाहीत. आमच्याकडे भरपूर माहिती आणि मुद्दे आहेत, असं शेख यांनी म्हटलं आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोपांची धार अधिक तीक्ष्ण होण्याची शक्यता आहे. यावेळी माजी आमदार शेख यांनी थेट आपल्या उमेदवारीची ही घोषणा करून टाकली. आपल्यावर खोटे आरोप करणाऱ्या मौलाना मुफ्ती यांचा आपण तुरुंगात गेलो तरीही पराभूत करू. तुरुंगातूनही निवडणूक लढवून जिंकण्याची आपली क्षमता आहे, अशा शब्दात त्यांनी इशारा दिला.

त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) गटाचे माजी आमदार शेख विरुद्ध 'एमआयएम' चे विद्यमान आमदार मौलाना मुफ्ती अशी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. माजी महापौरांवरील गोळीबाराच्या प्रकरणात मनमाड येथील हद्दपार गुन्हेगार मालेगावला आले होते.

या घटनेत दोन्ही गोळीबार झाला होता. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत. पोलिसांनी नुकतेच माजी आमदार अशिफ शेख आणि त्यांच्या कुटुंबातील इतरांचा जबाब नोंदविला आहे. शेख यांनी माजी महापौरांवर झालेल्या गोळीबारातील बंदुक नेपाळहून आणली होती. मनमाड येथील तडीपार गुन्हेगार मालेगावला आले होते.

त्याबाबत विविध माहिती आपण पोलिसांना दिल्याचं सांगितलं. तसंच पोलिस महासंचालकांना चौकशीसाठी निवेदन दिले आहे. या सर्व प्रकरणात आमदार मौलाना यांनी राजकारण करू नये, असंही शेख म्हणाले. त्यामुळे आता हे प्रकरण चांगलंच तापण्याची चिन्हं आहेत. या निमित्ताने सुरू झालेल्या राजकीय आरोप प्रत्यारोपामुळे विधानसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे. यातून एकंदरीत आगामी निवडणूक चुरशीची होईल हे स्पष्ट झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT