Bribe News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Malegaon Bribe News : सेवानिवृत्तीला दोन दिवस बाकी, मालेगाव महापालिका आयुक्तांसह तिघांना अटक ; प्रशासनात खळबळ

Malegaon Bribe News : मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांना निवृत्तीच्या दोन दिवस आधी अटक झाली आहे. त्यांच्यासह तिघांना एसीबीच्या पथकाने लाचप्रकरणी अटक केल्याने खळबळ उडाली आहे.

Ganesh Sonawane

Malegaon Bribe News : मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह तिघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अटक केली आहे. कंत्राटदाराची दोन वेगवेगळ्या कामांची तब्बल 20 लाख रुपयांची बिले मंजूर करण्यासाठी लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव हे 31 ऑक्टोबर रोजी शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे दोन दिवस उरलेले असतानाच ही कारवाई झाल्याने मोठी चर्चा रंगली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसीबीच्या पथकाने अत्यंत गुप्तपणे सापळा रचला. गवत काढण्याचे काम आणि जलवाहिनी कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली होती. या तक्रारीच्या आधारे विभागाने कारवाई केली. या प्रकरणात महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, त्यांचे स्वीय सहायक नीलेश पाटील आणि अकाउंटंट हरीश डिंबर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

कंत्राटदारांची बिले मंजूर करण्यासाठी ४ टक्के लाचेची मागणी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी एसीबीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांना अटक करण्यात आली असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पुढील तपासाला सुरुवात केली आहे. लाचखोरांच्या घरांची झडती घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आयुक्तांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचप्रकरणी अटक झाल्याने मालेगावसह महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

एसीबीचे पोलिस अधीक्षक भारत तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराच्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाचेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती. या प्रकरणात महापालिका आयुक्तांसाह तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. विशेष म्हणजे आयुक्त रवींद्र जाधव हे 31 ऑक्टोबरला सेवानिवृत्त होणार होते. सेवानिवृत्तीच्या दोन दिवस आधीच त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली आहे.

जिल्ह्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये दिवसांदिवस वाढ होत असून विविध शासकीय विभागांमधील बडे अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात अडकत असल्याचे चित्र आहे. मात्र, थेट महानगरपालिकेच्या आयुक्तांसारखा वरिष्ठ सनदी अधिकारीच लाचखोरीच्या प्रकरणात सापडल्याने त्याची प्रशासकीय वर्तुळात वेगाने चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT