Mangalprabhat Lodha farming remark controversy Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangalprabhat Lodha Farming Remark: 'शेतीकडे पाप म्हणून...', मंगलप्रभात लोढा यांच्या विधानावर वाद; मंत्रिमंडळातून हकालपट्टी कधी? किसान सभा राज्यभर आक्रमक

Ajit Nawale demands Mangalprabhat Lodha's removal: भाजपचे राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या वादग्रस्त विधानावरून राज्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत.

Pradeep Pendhare

Maharashtra minister farming controversy: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी खरीप हंगामाच्या पेरणीच्या कामात व्यस्त आहेत. अशातच महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे काही भागांतील शेतीचे नुकसान झाले असून, विदर्भात बनावट बियाण्यांमुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शेतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.

किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी भाजपचे (BJP) मंत्री लोढा यांच्या विधानाचा निषेध करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर कारवाई करून मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी केली आहे.

डाॅ. अजित नवले यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रतिक्रियेत म्हटले की, मंत्री लोढा यांनी "शेतीमुळे (Farmer) नव्हे, तर त्या काळातील स्टार्टअपमुळे भारत 'सोने की चिडिया' होता आणि त्या काळात शेतीकडे पाप म्हणून पाहिले जात होते," असे विधान केल्याचे सांगितले. हे वक्तव्य महाराष्ट्रातील शेतकरी आणि शेती व्यवसायाचा अवमान करणारे असल्याचा आरोप त्यांनी केला.

त्यांच्या मते, शेती आणि शेती व्यवसायाकडे तुच्छतेने पाहण्याचा हा दृष्टिकोन अत्यंत दुर्दैवी असून, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्राच्या हिताची नाही. मुख्यमंत्री यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित मंत्र्यांवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

मंत्री लोढा यांची यापूर्वीची वादग्रस्त विधाने

मंगलप्रभात लोढा यांची यापूर्वीही काही विधाने चर्चेत आली आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडाची तुलना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्यातून सुटकेशी केल्याने राजकीय वाद निर्माण झाला होता. तसेच महिला व बालकल्याण मंत्री असताना विधवा महिलांसाठी शासकीय कामकाजात 'गंगा भागीरथी' हा उल्लेख वापरण्याच्या सूचनेवरूनही टीका झाली होती.

युवकांच्या कौशल्यावरील विधानही चर्चेत

यापूर्वी रोजगाराच्या संदर्भात बोलताना, "नोकऱ्या उपलब्ध आहेत; मात्र युवकांकडे त्या मिळवण्यासाठी आवश्यक कौशल्य नाही," असे विधानही लोढा यांनी केले होते. तसेच इंधन टंचाईच्या काळात मुंबईतील एका जैन मंदिरातील धार्मिक कार्यक्रमासाठी अतिरिक्त गॅस सिलिंडरची मागणी केल्याच्या प्रकरणातही त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT