Shambhuraj Desai & Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangal Prabhat Lodha: पालकमंत्री नियुक्ती आधीच प्रकल्पांची पळवा पळवी?

Mangal Prabhat Lodha; Is Minister Girish Mahajan interested? will Movement to seize Chhatrapati's theme park-नाशिकच्या नियोजित छत्रपती शिवाजी महाराज थीम पार्क जळगावला नेण्याच्या हालचाली?

Sampat Devgire

Nashik Politics: मंत्र्यांचे खातेवाटप पूर्ण झाले आहे. आता पालकमंत्री कोण? याची चर्चा सुरू आहे. त्याआधीच मंत्र्यांच्या राजकीय वर्चस्वाच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे महत्त्वाच्या प्रकल्पांची पळवा पळवी होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या जिल्ह्यांचे पालकमंत्री पद मिळावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जोरदार राजकीय लॉबिंग सुरू आहे. याशिवाय पक्षनेते सुद्धा याबाबत अतिशय आग्रही आहेत. महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये सर्वच नेत्यांना रस असल्याने पालकमंत्री नियुक्त करताना मोठी कसरत करावी लागणार आहे.

त्याची प्रचिती नव्या सरकारच्या कामकाजातूनही दिसू लागली आहे. नाशिकला होऊ घातलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे थीम पार्क प्रस्तावित होते. २०२३ मध्ये ही संकल्पना मंजूर करण्यात आली होती. या संदर्भात नुकतीच मंत्रालयात संबंधित मंत्र्यांची बैठक मंगल प्रभात लोढा यांच्या दालनात झाली. यावेळी या प्रकल्पावर चर्चा झाली.

यामध्ये नाशिक येथे गंगापूर धरणाच्या पायथ्यालगत छत्रपती शिवाजी महाराजांचे थीम पार्क होणार होते. मात्र आता हा प्रकल्प जळगावला हलविण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यासाठी संबंधित खात्यावर राजकीय आणि मंत्र्यांचा दबाव असल्याची चर्चा आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने असे थीम पार्क राज्यात पाच ठिकाणी उभारण्याचा मनोदय आहे. त्यासाठी शासनाने गतवर्षीच मंजुरी दिली होती. आता त्याच्या कार्यवाहीच्या हालचाली आहेत.

सध्या मंत्र्यांचे खाते वाटप झाले आहे. त्यामुळे संबंधित खात्याचे मंत्री आपले निर्णय स्वतंत्रपणे घेण्यास समर्थ आहेत. त्यामुळे विविध प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात होणार आहेत. त्याचा ते स्वतंत्रपणे निर्णय देखील घेण्याची शक्यता आहे.

पालकमंत्री अद्याप नियुक्त झालेले नसल्याने संबंधित प्रकल्प होणाऱ्या जिल्ह्याच्या वतीने बाजू मांडण्यासाठी फारशी राजकीय ताकद कोणीही लावण्याच्या स्थितीत नाही. त्यातूनच नाशिकचा हा प्रकल्प आता जळगावला हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यामुळे राजकीय दृष्ट्या हा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

या आधीचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या दालनात या संदर्भात नुकतीच बैठक झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या थीम पार्क विषयावर चर्चा करण्यात आली. सध्या पर्यटन खाते शंभूराज देसाई यांच्याकडे आहे. यावेळी जळगावचे मंत्री गिरीश महाजन देखील उपस्थित होते. या बैठकीत नाशिकचा हा प्रकल्प जळगावला नेण्याच्या हालचाली सुरू झाल्याचे बोलले जाते. पालकमंत्री नियुक्त होण्याआधीच राजकीय दृष्ट्या आपल्या प्रभाव सिद्ध करण्यासाठी काही मंत्री कार्यरत झाले आहेत. त्याचा परिपाक म्हणजेच नव्या प्रकल्पांना गती देण्याचे काम सुरू झाले आहे. यामध्ये अनेक प्रकल्प प्रभावी मंत्री आपल्या सोयीनुसार आणि राजकीय हित पाहून अन्यत्र वळविण्याची शक्यता आहे. त्याचा फटका नाशिकला बसतो की काय, ही चर्चा सुरू आहे. ------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT