Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mangesh Chavan : चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांची विद्यार्थ्यांनी अडवली कार - काय घडलं? (Video)

Mangesh Chavan : जळगाव जिल्ह्यातील खरजई नाका येथून आमदार मंगेश चव्हाण यांचा ताफा जात होता. विद्यार्थ्यांनी यावेळी आमदार चव्हाण यांची गाडी अडवून त्यांना हात दिला. या घटनेचा व्हिडीओ देखील आहे.

Ganesh Sonawane

Jalgaon News : चाळीसगाव येथे बस थांब्यावर बस थांबत नसल्याने विद्यार्थ्यांनी थेट भाजप आमदार मंगेश चव्हाण यांची गाडी अडवल्याची घटना घडली. बस थांबत नसल्यामुळे आमची गैरसोय होत आहे, तासंतास आम्ही इथेच उभे असतो अशी व्यथा विद्यार्थ्यांनी मांडली.

चाळीसगाव शहरात ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणासाठी येत असतात. मात्र जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर जाणाऱ्या जलद बसेस या बस स्टॉप वर थांबत नसल्याने मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रारी यावेळी विद्यार्थ्यांनी आमदारांकडे केली.

आमदार मंगेश चव्हाण हे खरजई नाका येथून जळगाव कडे प्रवास करत असताना शुक्रवारी (दि. 8) रोजी बसस्टॉपवर बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थ्यांनी आमदारांना हात दिला. त्यांची गाडी थांबवली. इथे जलद बस थांबत नसल्यामुळे आम्हाला तासंतास वाट बघावी लागते अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली.

त्यानंतर आमदारांनी थेट आगार प्रमुखांना फोन करून बस थांबवण्याबाबत सूचना केल्या. आमदार चव्हाण यांनी चाळीसगाव आगार प्रमुख यांच्याशी संपर्क साधून जलद बसेस थांबा देण्याबाबत तात्काळ कार्यवाही करण्याची सूचना केली. विद्यार्थी मित्रांच्या भावना जाणून घेत त्यांनी या बाबतीत निश्चिंत राहावे असे आश्वासन आमदारांनी विद्यार्थ्यांना दिले.

त्याचवेळी तिथून एक बस आली, विद्यार्थी म्हणाले बघा मी पण आता थांबणार नाही. त्यावर मंगेश चव्हाण म्हणाले का बरं थांबणार नाही. त्यांनी स्वत:आवाज देत तेथून जाणारी बस थांबवली. सर्व विद्यार्थ्यांना त्यात बसण्यास सांगितलं व त्यांच्या जाण्याची सोय करून दिली. (Jalgaon news)

यासंदर्भातील एक व्हिडीओही आमदार चव्हाण यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. या सगळ्या प्रकाराची माहिती त्यांनी स्वत: पोस्ट करुन दिली. आता संबधित व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT