Kishor Patil & Mangesh Chavan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chavan Vs Patil : मंगेश चव्हाण यांच्या आमदारकीला आव्हान, अर्ज अवैध प्रकरण भोवणार? किशोर पाटील आक्रमक

Mangesh Chavan Kishore Patil : आमदार मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांचा अर्ज राजकीय दबाव आणून बाद केला. याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. ही कबुली त्यांच्या चांगलीच अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

Sampat Devgire

MLA Kishore Patil News: जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे पॅनल झाले. मात्र शिवसेना एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये राजकीय आरोप सुरूच आहेत. यामध्ये तडजोडीचे नेत्यांचे प्रयत्नही अपुरे पडले आहेत.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील आक्रमक आहेत. त्यांनी नगरपालिका निवडणुकीत भाजपला चांगलेच जेरीस आणले होते. आता जिल्हा बँकेवरून राजकारण टोकाला पोहोचले आहे.

भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी आमदार पाटील यांचे चिरंजीव सुमित पाटील यांचा अर्ज राजकीय दबाव आणून बाद केला. याची कबुली त्यांनी जाहीरपणे दिली. ही कबुली त्यांच्या चांगलीच अंगलट येण्याची चिन्हे आहेत.

आमदार मंगेश चव्हाण यांच्या कबुली नंतर आमदार पाटील चांगलेच संतापले आहेत. त्यांनी आमदार चव्हाण यांच्या आमदारकीलाच आव्हान दिले आहे. या प्रकरणात सहकार आयुक्त पासून तर मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांपर्यंत तक्रार करण्यात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रसंगी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिला.

किशोर पाटील यांनी मंगेश चव्हाण यांचे या निमित्ताने सगळेच काढले आहे. जिल्हा बँक निवडणुकीत मंगेश चव्हाण यांना धडा शिकवणारच आहे. भाजपने कितीही प्रयत्न केला तरी ते आमदार चव्हाण यांना वाचवू शकणार नाही, असे थेट आव्हान त्यांनी दिले आहे.

चव्हाणांच्या भानगडी उघड करू...

किशोर पाटील यांनी शिवसेनेच्या नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली आहे. आपल्या पक्षाला आणखी तीन जागा मिळाल्या असत्या. मात्र भाजपचे राजकारण आडवे आले. या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आमदार चव्हाण यांचे कारनामे त्यांना सांगितले आहेत. चव्हाण यांच्या अनेक भानगडी आहेत. त्या देखील उघड करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT