Manikrao Kokate Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : मंत्रिपद गमावलेले कोकाटे आता स्टार प्रचारकांच्या यादीतूनही बाद ; दादांनी थोडं बाजूलाच ठेवलं..

NCP Ajit Pawar Politics : सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यांची आमदारकी देखील धोक्यात आली होती पण सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला.

Ganesh Sonawane

Maharashtra Politics : राज्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुका पार पडल्यानंतर आता महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. येत्या 15 जानेवारीला महापालिका निवडणुकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निवडणुकीचा निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असून, राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करत फौजा मैदानात उतरवल्या आहेत.

यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महानगरपालिकांसाठी राष्ट्रवादीच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यात नाशिक जिल्ह्यातील मंत्री नरहरी झिरवाळ, माजी खासदार समीर भुजबळ यांना संधी देण्यात आली आहे. परंतू, यात नगरपरिषद निवडणुकांसाठी प्रभारी केलेले माजीमंत्री माणिकराव कोकाटेंना मात्र वगळण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी दि. १५ डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणुकांसाठी राष्ट्रवादीच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये 40 जणांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये युवा नेत्यांचा देखील समावेश आहे.

मागच्या महिन्यात झालेल्या नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रभारी म्हणून नाशिक, जळगाव, नंदुरबार जिल्ह्याची जबाबदारी माजीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर सोपविली होती. त्यावेळी मंत्री छगन भुजबळ हे आजारी असल्याने त्यांना जबाबदारी देण्यात आली नव्हती. भुजबळ यांच्याऐवजी समीर भुजबळ यांचा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश करण्यात आला होता. आताही मंत्री भुजबळ हे आजून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विश्रांती घेत असल्याने येवल्याचा गड राखलेल्या व किंगमेकर ठरलेल्या समीर भुजबळ यांना पुन्हा एकदा या यादीत स्थान देण्यात आले आहे.

नगरपरिषद निवडणुकांच्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोकाटेंवर मोठी जबाबदारी टाकली होती. परंतू, आता महानगरपालिका निवडणुक प्रचाराकरिता जाहीर करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीत कोकाटेंना स्थान देण्यात आलेले नाही. सदनिका घोटाळयामुळे कोकाटेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यात, सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिल्याने त्यांची आमदारकी वाचली आहे. मात्र, यात राष्ट्रवादीची मोठी बदनामी झाल्याने त्यांना पक्षाने बाजूला ठेवल्याची चर्चा आहे.

राष्ट्रवादीचे महानगरापालिका निवडणुकीकरिता नियुक्त केलेले स्टार प्रचारक खालील प्रमाणे-

१. अजित पवार

२. प्रफुल पटेल

३. सुनील तटकरे

४. हसन मुश्रीफ

५. धनंजय मुंडे

६. नरहरी झिरवाळ

७. बाबासाहेब पाटील

८. मकरंद जाधव-पाटील

९. दत्तात्रय भरणे

१०. अण्णा बनसोडे

११. अदिती तटकरे

१२. इंद्रनील नाईक

१३. धर्मराव आत्राम

१४. अनिल पाटील

१५. संजय बनसोडे

१६. प्रताप पाटील चिखलीकर

१७. नवाब मलिक

१८. सयाजी शिंदे

१९. मुश्ताक अंतुले

२०. समीर भुजबळ

२१. अमोल मिटकरी

२२. सना मलिक

२३. रूपाली चाकणकर

२४. इद्रिस नायकवडी

२५. अनिकेत तटकरे

२६. झिशान सिद्धिकी

२७. राजेंद्र जैन

२८. शरद पाटील

२९. सिद्धार्थ टी. कांबळे

३०. सुरज चव्हाण

३१. लहूजी कानडे

३२. कल्याण आखाडे

३३. सुनील मगरे

३४. नाझेर काझी

३५. महेश शिंदे

३६. राजलक्ष्मी भोसले

३७. सुरेखा ठाकरे

३८. नजीब मुल्ला

३९. प्रतिभा शिंदे

४०. विकास पासलकर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT