Dr. Radhakrishna Vikhe-Patil & Manikrao Kokate 
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate News : ...अखेर विखे पाटील यांनी दिले सिन्नरला पाणी!

Sampat Devgire

Sinner Politics on Water : यापूर्वी निळवंडे धरणातून कोपरगाव परिसरासाठी सोडलेल्या पाण्यातून सिन्नर तालुक्यालादेखील ते मिळणार होते. मात्र, त्यात राजकीय अडथळे आल्याने ते अडवण्यात आले होते. आता महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. (Water from Nilwande Irrigation project will get for east Sinner)

निळवंडे धरणातून यापूर्वी पाणी (Water) देण्याच्या सूचना महसूलमंत्री डॉ. विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिल्या होत्या. मात्र, त्यात अडथळे आले. आता आमदार माणिकराव कोकाटे, (Manikrao Kokate) खासदार हेमंत गोडसे तसेच खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रयत्नांमुळे विखे पाटील यांनी हे पाणी सिन्नरला (Sinner) उपलब्ध करून दिले.

नगर जिल्ह्यातील निळवंडेचे धरणाचे पाणी सिन्नरच्या पूर्व भागात खेळणार आहे. सोमवारी सायंकाळी निळवंडे डावा कालव्याच्या तळेगाव शाखेतून चिंचोली गुरव देवकवठेमार्गे पुन्हा आवर्तन सोडले असून, मलढोन, सायाळेपासून पाथरेपर्यंत वाहणाऱ्या धोदानी नदीतून पाणी सिन्नरच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये पोचणार आहे.

दुष्काळाचा सामना करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न काहीअंशी मार्गी लागेल. दीड महिन्यापूर्वी आवर्तन सोडले. मात्र, केवळ देवकवठेपर्यंत पाण्याचा लाभ मिळाला. पुढे कोपरगाव तालुक्यातील गावांसाठी तेथील स्थानिक आमदारांनी पाणी वळवले होते.

सिन्नरच्या शेतकऱ्यांनी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची भेट घेऊन पूर्ण आवर्तन देण्याची मागणी केली. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, खासदार हेमंत गोडसे, आमदार माणिकराव कोकाटे यांनी मंत्री विखे यांच्याकडे आवर्तनासंदर्भात पाठपुरावा केला. माजी मंत्री बाळासाहेब थोरात सिन्नरला हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आग्रही होते.

सिन्नरसाठी पाणी सोडल्यास त्याचा फायदा चिंचोली गुरव आणि देवकवठे गावांना होणार असल्याने सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांना यश येऊन मंत्री विखे यांनी जलसंपदा विभागाला सिन्नरसाठी आवर्तन सोडण्याचे निर्देश दिले. सिन्नरसाठी निळवंडेचे आवर्तन सोडले. या भागात वितरिकांची कामे न झाल्यामुळे चिंचोली गुरवपर्यंत नाल्याद्वारे पाणी आणून ते दोधानी नदीत सोडले आहे. नदी मार्गाने पाणी सिन्नर तालक्यातील वारेगावपर्यंत पोचविण्याचे नियोजन जलसंपदा विभागाने केले आहे.

याबाबत आमदार कोकाटे यांनी सांगितले की, सिन्नर तालुक्यात यंदा पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष आहे. पूर्व भाग नेहमीच पाण्यापासून वंचित राहिला. देव नदी वळण योजनेतून सायाळे आणि मिरगावसाठी दोन बंदिस्त पूरचाऱ्या प्रगतिपथावर आहेत. निळवंडेचे पाणी लाभक्षेत्रातील गावांना मिळणार असून, पूर्व भागात शेतीला शाश्वत पाणीपुरवठा होईल. निळवंडेच्या आवर्तनाचे पाणी शेवटच्या टोकाला नदी मार्गाने जाईपर्यंत आवर्तन सुरू ठेवावे, अशी मागणी करत मंत्री विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. त्याला आता यश येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT