Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: कृषिमंत्र्यांनी ‘मनसे’ला सुनावले, म्हणाले, कर्जमाफी हा वादग्रस्त मुद्दा!

Manikrao kokate;Loan waiver is a controversial issue, the government will decide on it-कर्जमाफीच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या मनसेला कृषिमंत्र्यांनी हिणवले

Sampat Devgire

Manikrao Kokate News: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा उचलून धरला आहे. नाशिकमध्ये गाजर आंदोलन झाले. त्यामुळे या प्रश्नावरून महायुतीला अडचणीत आणण्याचे प्रयत्न आहे.

प्रमुख राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार मनसेने नाशिक जिल्ह्यात शेतकरी कर्जमाफीचे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी हातात गाजर घेत महायुतीचा निषेध केला. यावेळी राज्य सरकारला इशारा देण्यात आला.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मात्र या आंदोलनाची हवाच काढून घेण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी हा वादग्रस्त विषय आहे. त्यात जे लोक नियमितपणे कर्जफेड करतात त्यांचेही काही म्हणणे आहे. कर्जफेड न करता थकबाकीदार राहायचे का? असा काहीच प्रश्न आहे.

मनसेकडे कोणताही विषय राहिलेला नाही. पक्षांकडे सुद्धा सरकार विरोधात काय बोलावे आणि काय मागणी करावी असा पेच आहे. त्यामुळे हे सगळे लोक कर्जमाफीची मागणी करीत आहेत. हा विषय धोरणात्मक असल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच त्यावर बोलू शकतील. वर काहीही भाष्य करणार नाही, या शब्दात त्यांनी विरोधकांचे आंदोलन निकाली काढले.

राज्यात गेले काही दिवसात अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतीचे आणि पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या संदर्भात जिल्हास्तरावर तातडीने पंचनामे करण्यात यावे त्याचा जिल्हाधिकाऱ्यांमार्फत नुकसानीचा अहवाल शासनाला प्राप्त होईल. हा अहवाल आल्यानंतर भरपाई बाबतचा निर्णय घेण्यात येईल, असेही कृषिमंत्र्यांनी सांगितले.

राज्यातील २५ जिल्हे आणि ११० तालुक्यांमध्ये पिकांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. संदर्भात मी स्वतः काही ठिकाणी भेट देऊन पाहणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातही पाहणी दौरा करणाऱ्या असल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT