Manikrao Kokate court decision Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate Politics: माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदावरील लटकती तलवार कायम, आज होणार फैसला!

Manikrao Kokate ministership in danger: शिक्षेला स्थगितीसाठी आज जिल्हा न्यायालयातील सुनावणीकडे सगळ्यांचे लक्ष

Sampat Devgire

Manikrao Kokate News: कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना बनावट कागदपत्र आणि फसवणूक प्रकरणी शिक्षा झाली आहे. न्यायालयाने दोन वर्षाची शिक्षा ठोठावली. त्यामुळे त्यांच्या मंत्रिपद व विधिमंडळ सदस्यत्व अडचणीत आले आहे.

बनावट कागदपत्रे सादर करून मुख्यमंत्री कोट्यातील सदनिका कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी घेतली होती. १९९५ मधील या प्रकरणावर नुकतीच सुनावणी झाली. त्यात कृषिमंत्री कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा उठवण्यात आली आहे.

लोकप्रतिनिधींना दोन वर्षे अथवा अधिक शिक्षा झाल्यास त्याचे सदस्यत्व रद्द होते. याबाबतच्या लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार कोकाटे यांना शिक्षेवरील स्थगिती मिळणे अपेक्षित आहे. तसे न झाल्यास कृषी मंत्री कोकाटे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष दोघेही अडचणीत येण्याची शक्यता आहे.

या संदर्भात सोमवारी कृषीमंत्री कोकाटे यांनी वरिष्ठ न्यायालयात दाद मागितली आहे. त्यात त्यांना अपिलाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र लोकप्रतिनिधित्व कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होऊ नये, यासाठी शिक्षेला स्थगिती अपेक्षित आहे. त्यावर न्यायालयाने आज सुनावणी करणार असल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयाने सोमवारी शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे. मात्र मूळ शिक्षेला स्थगिती मिळालेली नाही. यासंदर्भात आज सरकारी वकिलांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे कृषिमंत्री कोकाटे यांच्या पदावरील तलवार लटकतीच आहे. त्याचा फैसला आज दुपारी होणार आहे. न्यायालय याबाबत काय निर्णय देते, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.

दरम्यान या संदर्भात मूळ तक्रारदार आणि माजी राज्यमंत्री (कै) तुकाराम दिघोळे यांच्या कन्या अंजली राठोड यांनी कृषिमंत्री कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देऊ नये, असा अर्ज दिला होता. मात्र न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. या निमित्ताने सिन्नर तालुक्याच्या राजकारणातील दिघोळे विरुद्ध कोकाटे हा वाद पुन्हा एकदा पुढे आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT