Jarange Vs Bhujbal: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आज नाशिकमध्ये आहेत. त्यांच्या उपस्थितीत राज्यात सुरू असलेल्या शांतता रॅलीचा समारोप येथे होईल. या रॅली विषयी शहरात प्रचंड उत्सुकता आहे.
जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सातत्याने संघर्ष करीत आहेत. त्यांचा हा संघर्ष राज्य शासनाविरुद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसात त्याचा फोकस भाजप देखील आहे. यामध्ये छगन भुजबळ यांनी सातत्याने मराठा आरक्षणाच्या मागणीला फाटा फोडण्याचा प्रयत्न केला आहे.
आज मंत्री भुजबळ यांचे कार्यक्षेत्र असलेल्या नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली होत आहे. या रॅलीची जबरदस्त तयारी समर्थकांनी केली आहे. सबंध शहरात स्वागताचे फलक आणि भगवे झेंडे लावण्यात आले आहे. पोलिसांचा मोठा फौज फाटा आहे.
यावेळी जरांगे पाटील यांचे आजचे लक्ष्य कोण? याचे उत्तर प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते छगन भुजबळ हे आहे. याबाबत त्यांच्या निकटवर्तीयांनी त्याला दुजोरा दिला आहे. श्री भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या आंदोलनावर नुकतेच आव्हान दिले होते.
जरांगे पाटील यांनी राज्यात २८८ जागा लढवून दाखवाव्या, असे भुजबळ म्हणाले होते. हा एक राजकीय ट्रॅप आहे. छगन भुजबळ सातत्याने जरांगे पाटील यांना राजकीय गुंत्यात अडकवण्याचा प्रयत्न करीत असतात. या
या बाबत जरांगे पाटील यांच्या समर्थकांचा काल रात्री दीर्घकाल खल झाला. मराठा आरक्षण समाजातील गरीब आणि गरजू घटकांसाठी अत्यंत आवश्यक आहे. मात्र राजकीय नेते सत्तेसाठी याबाबत बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात. त्याला चोख उत्तर देण्याचे काम आज जरांगे पाटील आज करतील, असे सूत्रांनी सांगितले.
आज होणाऱ्या शांतता रॅलीची मोठी तयारी झाली आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मिरवणुकीच्या मार्गावरील वाहतूक अन्यत्र वळविण्यात आली आहे. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या आवारात मोठा मंडप उभारण्यात आला आहे.
शहरातील तपोवन मैदानापासून ही रॅली सुरू होईल. साधारणपणे पाच किलोमीटर या रॅलीचा मार्ग आहे. त्यात अनेक सामाजिक संस्था, कार्यकर्ते आणि सामाजिक घटक सहभागी होणार आहेत. विविध समाजाच्या नागरिकांकडून रॅलीच्या मार्गावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व स्वागताची तयारी झाली आहे.
नाशिक येथे ही शांतता रॅली आहे. त्यामुळे आजची मराठा आरक्षण शांतता रॅली ही जरांगे पाटील विरुद्ध छगन भुजबळ अशी ठरण्याची चिन्हे आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही रॅली असल्याने सत्ताधारी महायुतीचे घटक पक्ष, नेते या सगळ्यांनीच त्याला विरोधी पक्षाशी जोडण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय दृष्ट्या ही शांतता रॅली राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारला अडचणीची ठरण्याची चिन्हे आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधारी सरकारने आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत आश्वासन दिले. मात्र त्यावर कार्यवाही केली नाही. त्याबाबत समाजाचा व आरक्षण आंदोलनाच्या नेत्यांची नाराजी आहे.
-----
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.