Chhagan Bhujbal, Manoj Jarange Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाला विरोध केला, तर कुणालाही सोडणार नाही; जरांगेंचा भुजबळांना इशारा

Maratha Reservation And Chhagan Bhujbal : मुदत संपण्यापूर्वीच सरकार मराठा आंदोलकांत फूट पाडण्याची जरांगेंना भीती

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : गावागावांमध्ये मराठा व ओबीसी समाज आजही गुण्यागोविंदाने राहतो. एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होतो. काही नेते मात्र आमच्यात फूट पाडतात. त्यांनी ओबीसी व मराठ्यांना वेगळे करण्याचा डाव आखला आहे. आमच्या हिश्श्याचे आरक्षण मराठा समाजाला त्यांनी आनंदाने द्यावे, आम्हीही ते स्वीकारू. आमच्या आरक्षणाला विरोध केला तर आम्ही कुणालाही सोडणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी मंत्री छगन भुजबळ यांना इशारा दिला आहे. (Latest Political News)

मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली या ठिकाणी उपोषण करणारे जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे. ही मुदत येत्या शनिवारी पूर्ण होत आहे. त्यापूर्वीच अंतरवाली गावात मोठा मेळावा होणार आहे. तत्पूर्वी, मराठा समाज बांधवांचे आंदोलन सुरू आहे, त्या ठिकाणी जाऊन जरांगे आंदोलकांची भेट घेत आहेत. त्यानुसार त्यांनी रविवारी व सोमवारी नाशिक जिल्ह्याचा दौरा केला. या वेळी पत्रकार परिषदेतून पुन्हा मंत्री भुजबळांवर निशाणा साधला.

ते म्हणाले, 'मराठा आरक्षणाला सातत्याने भुजबळ (Chhagan Bhujbal) विरोध करतात. कुणबी आणि मराठा एकच आहेत. त्यामुळे मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातूनच आरक्षण मिळाले पाहिजे. त्याला भुजबळांचा विरोध असून, तो चुकीचा आहे. चार दिवसांपूर्वी त्यांनी मराठा समाज फक्त मलाच टार्गेट का करतोय, माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही, असे म्हणाले. त्यावेळेपासून आम्ही भुजबळांविरोधात एक शब्द उच्चारलेला नाही. आता त्यांनी यापुढेही विरोध करू नये,' असे आवाहनही जरांगे पाटलांनी केले.

सरकार आंदोलनात फूट पाडू शकते

मराठा समाजाचा येत्या शनिवारी जालना जिल्ह्यात मोठा मेळावा होत आहे. त्यात सरकार फूट पाडण्याचा प्रयत्न करू शकते. त्यामुळे समाज बांधवांनी आतापासूनच सावध राहायला हवे, असे मराठा समाज बांधवांना आवाहन करून जरांगेंनी सरकारच्या कावेबाजपणावर टीका केली.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT