NCP
NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

अध्यक्षपदाचा राष्ट्रवादीसमोर पेच; देवकर, खडसे अन् पाटलांमध्ये रस्सीखेच

कैलास शिंदे : सरकारनामा ब्यूरो

जळगाव : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत (Jalgaon District Bank) महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलला बहुमत मिळाले आहे. यात राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक ११ जागा मिळाल्याने अध्यक्षपद त्यांच्याकडे जाणार आहे, अध्यक्षनिवड स्थानिकस्तरावर करावी असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कळविले आहे. तर स्थानिक स्तवरावर गुलाबराव देवकर यांचे नाव निश्‍चीत होते, मात्र अन्य दावेदारही पुढे आल्याने पेच निर्माण झाला आहे. अर्थात याबाबतचा अंतीम निर्णय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे घेतील असे सांगितले जात आहे.

जळगाव जिल्हा बँकेत महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलला बहुमत मिळाले आहे. २१ पैकी २० जागा या पॅनलला मिळाल्य असून राष्ट्रवादी कॉंग्रेसला सर्वाधिक ११ जागा मिळाल्या आहेत, त्यामुळे राष्ट्रवादीचा अध्यक्ष होणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यांच्या नावावर एकमत होण्याचीही शक्यता आहे. मात्र माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांची नावे चर्चेत आहेत. संचालक पदाची हॅटट्रीक करणारे संचालक संजय पवार हे सुध्दा दावेदार आहेत. जिल्हा बँकेच्या विद्यमान अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे या पदासाठी पुन्हा इच्छुक आहेत. या शिवाय अमळनेर येथील आमदार अनिल भाईदास पाटील यांनीही इच्छा दर्शविली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे त्यांनी आपणही या पदासाठी इच्छुक असल्यचे सांगितल्याची माहिती मिळाली आहे.

स्थानिक स्तरावर निर्णय घ्या: जयंत पाटील

राष्ट्रवादी कॉंग्रसेचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्र जयंत पाटील हे रविवार (ता.२९) रोजी जळगाव येथे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यास आले होते. त्या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड.रविद्र पाटील यांनी त्यांची भेट घेतली. व जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निर्णयावर चर्चा केली. त्या वेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उमेदवार निवडीचा विषय तुम्ही स्थानिक स्त्तरावर घेतला आहे, त्यामुळे अध्यक्ष निवडीचा निर्णय स्थानिक स्तरावर एकमताने घ्या असे सूचविले असल्याचे सांगण्यात आले. या वेळी गुलाबराव देवकर, आमदार अनिल पाटील, माजी आमदार मनीष जैन उपस्थित होते.

वरीष्ठस्तरावरून नावाचा निर्णय

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले, कि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अध्यक्षपदाचा निर्णय स्थानिक स्तरावर घेण्याचे सांगितल आहे. याबाबत आपण एकनाथराव खडसे यांची भेट घेतली, त्यांनी सांगितले कि, आपण स्थानिक स्तरावर बैठक घेवून नाव निश्‍चित करू आणि ते वरीष्ठांना कळवू तो जो निर्णय घेतील त्यानसार अध्यक्ष जाहिर करू.

उद्या होणार बैठक

जिल्हा बँक अध्यक्षपदाची निवड शुक्रवार (ता.३) रोजी होणार आहे, त्यामुळे नाव निश्‍चित करण्यासाठी उद्या (ता.२) रोजी बैठक होणार आहे. याबाबत जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील यांनी सांगितले, कि बैठक अद्याप निश्‍चित झालेली नाही, मात्र उद्या (ता.२)अजिंठा शासकीय विश्रामगृहात नवनिर्वाचित संचालकाची बैठक पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली होईल, यावेळी चर्चा करण्यास येईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT