Eknath Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

एकनाथ शिंदे गटाचे टार्गेट, मराठा समाजाचे नगरसेवक

शिवसेनेचे बारा माजी नगरसेवक संपर्कात असुन लवकरच प्रवेश होईल असा नेत्यांचा दावा.

Sampat Devgire

नाशिक : राज्यात (Maharashtra) जून महिन्यात महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जय महाराष्ट्र करत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भारतीय जनता पक्ष (BJP) सोबत चाळीस आमदारांच्या मदतीने युती करत शिंदे- भाजप युतीचा नवा फॉर्मुला राज्यात आणला. सत्ता स्थापन झाल्यानंतर शिंदे यांच्याकडून थेट शिवसेनेलाच (Shivsena) आव्हान दिले जात आहे. (Eknath Shinde group trying hard to break Shivsena in Nashik)

शिंदे गटाकडून शिवसेनेत मोठे भगदाड पाडण्याची तयारी झाली असून बारा माजी नगरसेवक थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या संपर्कात आले आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला हा मोठा धक्का नाशिकमध्ये राहणार आहे. आत्तापर्यंत सुरक्षित मानले जाणारे नाशिक उद्धव ठाकरे यांच्या नजरेत रेड झोनमध्ये आले आहे.

पक्ष चिन्हाबरोबरच शिवसेना आपलीच असल्याचा दावा करताना या विरोधात न्यायालयात देखील दाद मांडण्यात आली आहे. एकीकडे राजकीय डावपेच खेळताना शिंदे गटाकडून शिवसेनेला भगदाड पाडण्याचे काम होत आहे. नाशिकमध्ये आतापर्यंत शिवसेना अधिक सुरक्षित मानली जात आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून माजी नगरसेवक शिंदे गटाच्या संपर्कात आल्याने राजकीय हालचाली गतिमान झाल्या आहेत. पंधरा डिसेंबरला १५ माजी नगरसेवकांच्या प्रवेशाचा मुहूर्त निश्चित झाला होता. मात्र अधिक विलंब होत असल्याने येत्या दोन दिवसात प्रवेश होण्याची शक्यता आहे.

सिडकोतील नगरसेवकांची संख्या अधिक

शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या ज्या १२ नगरसेवकांचे प्रामुख्याने नाव येत आहे. त्यातील जवळपास ९५ टक्के माझी नगरसेवक हे मराठा समाजाचे आहे. त्यामुळे मराठा समाजाचे मतदान आगामी महापालिका निवडणुकीत वळविण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न दिसत आहे. सिडको विभागातील पाच, सातपूर विभागाचे दोन, नाशिक रोड विभागातील दोन पश्चिम विभागातील एक तर चुंचाळे शिवारातील एका माजी नगरसेवकाचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

संभ्रम अन भीती

जे नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे. त्यांच्या संभ्रम आणि भीती देखील आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर खरोखर लाभ पदरात पडेल का ? पुन्हा निवडून येऊ का अशा प्रश्नांचे काहूर निर्माण झाल्याने देखील पक्षप्रवेशाला विलंब होत असल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकीसाठी निधी

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांना उमेदवारी देण्याबरोबरच निवडणूक खर्चासाठी देखील नियोजन झाल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रभाग विकासासाठी निधी देखील दिला जाणार असल्याची चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT