Ramdas Kadam & Narayan Rane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : नारायण राणे, कदम यांची काढली प्रतिकात्मक अंत्ययात्रा!

Sampat Devgire

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्या चांगलेच अंगलट आले आहे. या विधानाच्या तीव्र प्रतिक्रिया धुळे शहरात उमटल्या आहेत. (Dhule Maratha community protest Narayan Rane & Kadam`s statement)

मराठा समाजाला (Maratha Reservation) आरक्षण मिळावे, ही अतिशय वास्तव मागणी आहे. त्यासाठी मदत न करता, त्यावर उपहास करणारे भाजपचे (BJP) समर्थक अडचणीत आले आहेत. त्यांचा धुळे (Dhule) येथे निषेध करण्यात आला.

धुळे शहरात सोमवारी संतप्त मराठा समाजाच्या आंदोलकांनी उपहास करणाऱ्या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. त्यांच्या प्रतिमेचे महापालिकेसमोर दहन करीत धिक्कार केला. राज्य शासन याबाबत अतिशय संथगतीने काम करीत असल्याने त्याचा निषेध करण्यात आला.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू आहे. धुळे येथे मराठा समाजातर्फे साखळी उपोषण सुरू आहे. राज्यभर मराठा आंदोलनाची धग सुरू असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि एकनाथ शिंदे गटाचे माजी मंत्री रामदास कदम यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नसल्याचे वादग्रस्त विधान केले होते. त्याबाबत सर्व थरातून नाराजी व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

जोडे मारो आंदोलन

या वक्तव्याचा मराठा समाजातून तीव्र निषेध करण्यात आला. विविध भागात त्याचा निषेध होत आहे. येथील मराठा आंदोलकांनीही शहरातील क्युमाइन क्लबपासून या नेत्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. महापालिका कार्यालयासमोर त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून दहनही करण्यात आले. त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.

मराठा समाजाच्या जोरावर केवळ नेतेच नव्हे, तर सत्ता भोगणाऱ्यांनी समाजावर अन्याय होत असताना समाजासोबत राहण्याचे सोडून विरोधाची भूमिका घेतल्याने संपूर्ण मराठा समाजातून या नेत्यांचा धिक्कार केला.

या वेळी आंदोलनात भानुदास बगदे, विनोद जगताप, साहेबराव देसाई, दीपक रौंदळ, मनोज ढवळे, दिनेश काळे, रवी नागणे, संजय बगदे, आबा कदम, अशोक सुडके, राजू इंगळे, निंबा मराठे, भय्या शिंदे, वीरेंद्र मोरे, मोतीलाल मराठे, ज्ञानेश्‍वर मराठे, संदीप पाटोळे, संदीप सूर्यवंशी, प्रफुल्ल माने आदी सहभागी झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT