Hemant Godse & Maratha workers Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation News : राजीनाम्याचे नाटक हेमंत गोडसेंच्या अंगलट

Hemant Godse Resignation : चाळीस दिवसांनी उपोषणस्थळी गेलेल्या गोडसेंचा आंदोलकांनी शेलक्या शब्दांत समाचार घेत पिटाळून लावले

Sampat Devgire

Nashik Maratha Agitation : खासदार हेमंत गोडसे मराठा आरक्षण आंदोलन पेटल्यावर काल ते उपोषणस्थळी गेले. या वेळी आंदोलकांनी त्यांचा शेलक्या शब्दांत समाचार घेत अक्षरश: त्यांना पिटाळून लावले. त्यामुळे त्यांना तेथून काढता पाय घ्यावा लागला.

खासदार गोडसे (Hemant Godse) यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याक़डे पाठवल्याचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यावरदेखील नेटकरी तसेच आंदोलकांनी (Maratha) चांगलेच ट्रोल केले.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून नाशिकला छत्रपती शिवाजी महाराज स्मारकात चाळीस दिवसांपासून उपोषण सुरू आहे. काल खासदार गोडसे येथे गेले होते. या वेळी संतप्त आंदोलकांनी अतिशय शेलक्या शब्दांत समाचार घेतला.

‘चाळीस दिवस कुठे होता, येथे येण्यासाठी ४० दिवस का लागले, मराठा समाजाची जाहीरपणे भूमिका घ्यायला तुम्हाला लाज वाटते का, यापासून तर अनेक शेलक्या शब्दांचा वापर या वेळी झाला. या प्रश्नांच्या सरबत्तीने व आंदोलकांच्या तीव्र भावना पाहून खासदार गोडसेंनी काढता पाय घेतला.

त्यानंतर काही वेळाने गोडसे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या आंदोलनाला पाठिंबा म्हणून राजीनामा देत असल्याचे पत्र मुख्यमंत्री शिंदे यांना दिल्याचे फेसबुकवर टाकले. त्यानंतर एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांसह शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा संताप अनावर झाला. त्याचे तीव्र पडसाद सोशल मीडियावरील प्रतिक्रियांतून उमटले.

जनतेला मूर्ख समजता काय?

राजीनामा देण्याची एक प्रक्रिया असते. तो लोकसभेच्या सभापतींकडे द्यायचा असतो. एकनाथ शिंदे राजीनामा मंजूर करू शकता काय?. जनतेला मूर्ख समजता काय?. इथपासून तर गोडसे यांचा आंदोलकांनी घेतलेल्या समाचाराचे व्हिडिओदेखील व्हायरल झाल्याची चर्चा पसरली.

एकंदरच एरव्ही सतत विकासकामांच्या पत्रांचा फार्स करणारे व कोणत्याच संघटनात्मक कार्यक्रमांकडे पाठ फिरवणाऱ्या हेमंत गोडसेच्या अंगावर हे प्रकरण चांगलेच शेकले. राजीनामा अस्त्र तर अक्षरश: बुमरँग झाले. त्यामुळे सायंकाळी मराठा आंदोलकांत गोडसे यांच्याविषयीच चर्चा होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT