Manoj Jarange On Devendra Fadnavis Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'हिंदूच हिंदू मारायला निघालाय'; जरांगे पाटील फडणवीसांवर एकेरी भाषेत भडकले

Maratha Leader Manoj Jarange Slams CM Devendra Fadnavis Over Hindu-Muslim Issue in Ahilyanagar : हिंदू-मुस्लिम वादावर मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटलांनी भाजप सीएम देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली.

Pradeep Pendhare

Hindu Muslim issue Maharashtra : भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम वादावरून मराठा आरक्षणासाठी संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील चांगलेच संतापले.

भाजप नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर एकेरी भाषेत हल्ला चढवला. 'हिंदूच हिंदू मारायला निघायला आम्हाला, ही कोणती पद्धत आहे तुमची, जर जातंचं संपली, तर धर्म कसा टिकवायचा', असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मुंबई 29 ऑगस्टला होणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील राज्यभर दौरे करत आहे. अहिल्यानगर इथं देखील त्यांनी मराठा आंदोलकांशी संवाद साधला. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राज्यात सुरू असलेल्या हिंदू-मुस्लिम वादावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर एकेरी भाषेत जोरदार हल्ला चढवला.

मनोज जरांगे पाटील म्हणाले, "त्याला काही कामाचं नाही. आमचेच धड नाहीत. मराठे, मुस्लिम (Muslim), दलित हे आमचे धडाचे नाहीत. हे जर नीट राहिले, तर तो मुसलमानाचं, कुणाचंही वाकडं करू शकत नाही. फक्त दंगली करायच्या आहेत, अन् त्यातून मत भागून घ्यायचे आहेत. नुसतेच आम्हाला एकमेकांमध्ये झुंझवत्यात, आमच्यातच कुटा-कुटी लावत्यात, घेणं नाही, देणं नाही".

'आयुष्याला जे लागतं ते दिले पाहिजे. हिंदू धर्म टिकवायचाय ना, मग आम्ही कोण आहोत, हिंदू आहे ना, कर ना आमच्या लेकरं-बाळांना मोठं, मराठे हिंदू नाही का? नुसते मारामाऱ्यांना लागतात का हिंदू-मराठे? लेकरं-बाळ रोज ओरडतात की, आरक्षण दे म्हणून. हिंदू धर्म टिकवून धरायचाय ना, हिंदू धर्म आम्हीच टिकवतोय, सगळ्यात अगोदर आम्ही काठ्या घेऊन असतो', असेही जरांगे पाटील यांनी म्हटले.

'मराठ्यांशिवाय कोणी परंपरा पाळत नाही. पण आज आमचेच मुडदे पाडायला निघाला. आम्ही जातवान, अस्सल हिंदू आहोत. आम्हाला स्वाभिमान आहे, धर्माचा! पण जातच संपायला लागली, तर धर्म कसा टिकवायचा, आम्हाला आरक्षण द्या मग, हिंदुंचा पगडा आहे. तुला वाटतं नाही हिंदू मोठे व्हावं, मराठ्याचे हिंदू गरीब आहे, त्यांना दिलं, तर ते मोठे होतील ना, लढायला सक्षम होतील', असाही घणाघात जरांगे पाटील यांनी केला.

'पण मोघम सांगायचं, मुसलमानांचं असं, हिंदूचं असं, मुसलमानांनी आता काही त्रास दिला का? नाही, मग का बरं त्यांच्या माग लागायचं. त्रास दिल्यावर बघू, ते काहीच म्हणत नाही, जे म्हणतंय त्याच्या मागं लागायचं नाही. आता आमचाच हिंदू विरोध करतोय, छगन भुजबळ कोण आहे, हिंदू नाही का तो?' असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

'त्याला बोला. कशाला आरक्षणाला विरोध करतो, हिंदूच हिंदू मारायला निघायला. ही कोणती पद्धत आहे तुमची, छगन भुजबळला वाटायला पाहिजे, हिंदू मोठा व्हावा, हिंदूमधला मराठा वर्ग मोठा आहे, मारामाऱ्या करायचं असल्यावर हिंदू धोक्यात आला, आरक्षण मागितल्यावर तुम्ही आमच्यात येऊ नका, का? हे हिंदू आहे का तुमच्यातलं', असा प्रश्न जरांगे पाटलांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT