Maratha REservation, OBC Reservation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha Reservation : '...अन्यथा ओबीसी, भटके विमुक्तांचे मतदान विसरा'

Maratha Reservation Obc Samata Parishad Protest : समता परिषदेने आमदारांना दिला मतदान विसरण्याचा इशारा

Arvind Jadhav

Nashik Politics Latest News :

मराठा कुणबी आरक्षणाच्या बाबतीत काढण्यात आलेला सगेसोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्यात यावा. अन्यथा ओबीसी भटके विमुक्तांचे मतदान विसरा, अशा इशारा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नाशिक शहराध्यक्षा कविता कर्डक यांनी दिला.

सगेसोयरे शासन राजपत्र मसुदा रद्द करण्याबाबत आज नाशिक शहर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदच्या कार्यकर्त्यांनी लोकप्रतिनिधींच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. परिषदेच्यावतीने खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे तसेच जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

लोकप्रतिनिधी हा सगळ्याच नागरिकांचा प्रतिनिधी असतो. आमदार हा कुठला एका जातीचा किंवा धर्माचा नसतो. असे असताना जेव्हा 54 टक्के ओबीसी समाजावर अन्यायकारक निर्णय विधिमंडळात होत आहे. अशा वेळेस लोकप्रतिनिधी मूक गिळून गप्प का बसले, असा सवाल कर्डक यांनी उपस्थित केला. तसेच येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये जो ओबीसी समाजाच्या हितासाठी आवाज उठवणार फक्त त्यालाच ओबीसी समाज मतदान करेल. झुंडशाहीच्या दबावाला बळी पडेल, त्याला विधिमंडळात जाण्याचा अधिकार नाही, असेही त्या म्हणाल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब कर्डक, युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, भालचंद्र भुजबळ, महिला शहराध्यक्ष आशा भंदुरे, समता परिषदचे मध्य नाशिक विभाग अध्यक्ष नाना पवार, पंचवटी विभाग अध्यक्ष सचिन जगताप, नाशिक रोड विभाग अध्यक्ष अजय बागुल, सातपूर विभाग अध्यक्ष भरत जाधव, सिडको विभाग अध्यक्ष अमोल नाईक, राकाशेठ माळी, शंकर मोकळ, अरुण थोरात, पोपटराव जेजुरकर ,श्रीराम मंडळ, अरुण थोरात, गजू भाऊ घोडके , ज्ञानेश्वर महाजन, योगेश दिवे, अविनाश माळी, मीनाक्षी काकळीज, रूपाली पठारे, दिलीप माळी, अर्जुन भडके यांच्यासह अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

edited by sachin fulpagare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT