Dr. Radhakrishna Vikhe Patil & Chhagan Bhujbal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Maratha- OBC issue: विखे पाटील यांचा छगन भुजबळांना टोमणा!

Maratha Reservation issue, Dr. Vikhe Patil comment on Chhaga Bhujbal-महाराष्ट्रात सध्या निर्माण हाऊ लागलेले वातावरण राज्याच्या दृष्टीने योग्य नसल्याचे संकेत

Sampat Devgire

Maratha reservation issue : महाराष्ट्र हे शांतताप्रिय आणि नागरिकांत बंधूभाव असलेले राज्य आहे. ही सुव्यवस्था कायम राहिली पाहिजे. कोणीही त्याला बाधा आणता कामा नये. त्यासाठी संयम ठेवला पाहिजे. (Maharashtra state has a harmony and peace at present, that shall maintened)

राज्याचे महसूलमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (Dr. Radhakrishna Vikhe-Patil) यांनी सध्याच्या मराठा आरक्षणाच्या (Maratah Reservation) विषयावर ओबीसी (OBC) संदर्भात केली जाणारी विधाने योग्य नसल्याचे मत व्यक्त करीत, राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे नाव न घेता त्यांना टोमणा मारला आहे.

महसूलमंत्री विखे पाटील यांना सध्याच्या मराठा आरक्षणावरून काही ओबीसी नेत्यांनी केलेल्या टीकेबाबत विचारले असता, त्यांनी आंदोलकांशी झालेल्या चर्चेनंतर मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाला मुदत मिळाली आहे. त्याबाबत राज्य सरकारने अतिशय व्यवस्थितपणे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

यासंदर्भात काही नेत्यांच्या विधानांनी विनाकारण मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण होत आहे. ते राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. जी मुक्ताफळे उधळली जात आहेत, त्याबाबत सरकारमध्ये काम करणारे असतील किंवा बाहेरचे कोणी असतील, या सगळ्यांनी राज्य सरकारला काम करू दिलं पाहिजे, अशी अपेक्षा आहे.

महसूलमंत्री विखे पाटील यांच्या विभागाने याबाबत अतिशय चांगली व गतिमान कामगिरी केली आहे. मराठा आरक्षणासंदर्भात नेमलेल्या न्यायमूर्ती शिंदे आयोगासाठी कुणबी जातीच्या नोंदी शोधण्याचा भार प्रामुख्याने महसूल विभागावर आहे. त्याबाबत ही यंत्रणा अतिशय चागंली काम करीत असल्याने ओबीसी आरक्षणाबाबत भुजबळ यांच्या विधानांवरून त्यांना हा गंभीर टोमणा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT