NCP womens front given memorandum to nashik Police Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

दक्षिणा मिळत नसल्याने तुषार भोसले यांचे मानसिक संतुलन बिघडले

महिलांच्या शिष्टमंडळाने नाशिक रोड पोलिस ठाण्यात निवेदन दिले.

Sampat Devgire

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (NCP president Sharad Pawar) यांच्याविषयी भाजपचे अध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले (BJP spiritual front cheif Tushar Bhosle) यांनी अतिशय हीन दर्जाची टिका केली आहे. त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष अनिता भामरे (NCP city president Anita Bhamre) यांनी केली आहे.

महिलांच्या शिष्टमंडळाने नाशिक रोड पोलिस ठाण्यात निवेदन देऊन तुषार भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

श्री. भोसले यांनी शरद पवार यांच्याविषयी अतिशय हीन दर्जाच्या भाषेचा वापर केला. त्यामुळे नागिरकांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. त्यामुळे आता तुषार भोसलेंचे तोंड फोडण्याची वेळ आली आहे, असे राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष भामरे यांनी म्हटले आहे.

त्या म्हणाल्या, मुल जन्माला आले कि, लहानपणापासूनच घरातील आई- वडील त्याच्यावर चांगले संस्कार करतात. ज्येष्ठांचा सन्मान करणे ही संस्कृती आहे, पण तुषार भोसलेंच्या घरात संस्कृतीशून्य वातावरण असावे. त्याच्या बोलण्यातून हे दिसून आले आहे. गेल्या दिड वर्षांपासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिरे बंद होती. कदाचित दक्षिणा मिळत नसल्याने तुषार भोसले यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असेल. आता मंदिरे सरकारने खुली केली आहेत. तेव्हा देवासमोर प्रार्थना करतांना श्लोक म्हणा, शेण खाऊ नका. नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तुमचे तोंड फोडल्या शिवाय शांत बसणार नाही.

`राष्ट्रवादी`च्या शहराध्यक्षा भामरे यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक गणेश न्हायदे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मध्य विधानसभा अध्यक्ष रंजना गांगुर्डे, नासिक रोड विभाग अध्यक्ष रूपाली पठारे, पंचवटी अध्यक्ष सरिता पगारे, पश्चिम अध्यक्ष योगिता आहेर, शहर उपाध्यक्ष शाकेरा शेख, वैशाली ठाकरे, विद्या बर्वे, सिमी राणा आदि महिला उपस्थित होत्या.

...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT