Ajit Pawar Passed Away Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजितदादांशिवाय विधिमंडळ अपूर्ण! एकनाथ खडसे म्हणाले, ‘राज्याच्या नेतृत्वाची क्षमता त्यांच्यात दिसत होती’

Eknath Khadse on Ajit Pawar Demise: विरोधी पक्षनेता म्हणून टीका केल्यावर देखील अजित पवार आणि माझे संबंध बिघडले नाही.

Sampat Devgire

Eknath Khadse News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवीनिधन झाले. या घटनेने सबंध महाराष्ट्राला हादरवले. सर्व पक्षातील राजकीय नेत्यांनी यावर हळूहळू व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. अजित पवार हे अत्यंत धडाडीचे नेते होते. निर्णय घेण्याची त्यांची क्षमता वाखाणण्याजोगी होती.

एकनाथ खडसे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची बातमी समजल्यावर धक्का बसला. १९९१ पासून मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या नेतृत्वाचे विविध पैलू होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणा नेहमीच चर्चेत राहिला.

कार्यकर्ता, नेता त्यांच्याकडे काही काम घेऊन गेला तर ते आवर्जून त्यात लक्ष घालत असत. काम होणारे असेल तर लगेच कार्यवाही करीत असत. होणारे नसेल तर स्पष्टपणे नाही म्हणण्याची क्षमता त्यांच्याकडे होती. यात वेळ वाया घालवू नका, असे ते सांगत.

उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक कामे केली. ज्याच्या विविध निर्णय प्रक्रियेत त्यांचा सहभाग राहिला. धडाडीचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. राज्याचे नेतृत्व करण्याची क्षमता अजित पवार यांच्याकडे होती. भविष्यात ते मुख्यमंत्री देखील होऊ शकले असते.

मी विरोधी पक्षनेता असताना ते सत्तेत होते. त्यांच्या विभागावर आणि त्यांच्या कामकाजावर मी अतिशय आक्रमकपणे टीका केली होती. विधिमंडळात त्यांच्या विभागाच्या कामावर टीका केल्यावरही त्यांनी कधी दुरावा मानला नाही. ती विरोधी पक्षाची अर्थत विरोधकांची टीका आहे म्हणून स्वीकारली. त्यामुळे आमचे संबंध कधी बिघडले नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारखा अष्टपैलू नेता दुर्मिळ असतो. त्यांच्या नसल्याने देशाचे आणि राज्याचे निश्चितच मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या बाबतीत अनेक प्रसंग आणि वैशिष्ट्य सांगता येण्यासारखी आहेत, असे खडसे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT