Nashik News: शिंदे गटाचे नेते, मंत्री दादा भुसे आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यात गुप्त भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. नाशिकमधील त्र्यंबकेश्वर रोडवरील एका खासगी रिसॉर्टवर ही भेट झाल्याचेही बोलले जात आहे. या भेटीच्या चर्चांवर आता दादा भुसे यांनी खुलासा करत अशी कोणतीही आणि कोणाशीही आपली भेट झाली नसल्याचे सांगितले आहे.
"आदित्य ठाकरे यांच्या भेटीचा विषयच नाही. हे वृत्त कल्पोकल्पित असून दुपारी 12 वाजेपासून चार वाजेपर्यंत आपल्यासोबत आहे. चार वाजेनंतर मी खासगी गाडीतून नातीच्या वाढदिवसाला आलो. यापलिकडे आणखी काय सांगायचे ?", असे स्पष्टीकरण दादा भुसे यांनी दिले आहे. त्यामुळे भेटीबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांच्या गुप्त भेटीमुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले होते. या चर्चा संपत नाही तोच मंत्री दादा भुसे आणि आदित्य ठाकरे यांच्या गुप्त भेटीच्या चर्चा रंगल्यामुळे राज्याच्या राजकारणात नेमकी काय शिजतंय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
आदित्य ठाकरे यांनीही या संदर्भात स्पष्टीकरण दिले असून "आपण कुणालाही हुडी घालून भेटायला जात नाही. आम्ही स्वच्छ राजकारण करतो, त्यामुळे कुणाशीही छुप्या भेटीची गरज नाही ", असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. त्यामुळे आता या भेटीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.