Gulabrao Patil, girish mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Gulabrao Patil News : गिरीशभाऊपेक्षाही मी मोठा आमदार; 'मातोश्री'मध्ये गुलाबराव पाटील थेटच बोलले...

Jalgoan Politics : ते मोठ्या खात्याचे मंत्री आहेत, याचे मला काय घेणं-देणं नाही.

Mangesh Mahale

Jalgoan News : महाविकास आघाडीत असताना आणि शिंदे गटात गेल्यानंतरही गुलाबराव पाटलांना पाणीपुरवठा खातं मिळालं, तर गुलाबरावांच्याच जळगाव जिल्ह्यातील दुसरे मंत्री गिरीश महाजन हे ग्रामविकासमंत्री आहेत. दोन्ही मंत्र्यांमध्ये समन्वय चांगला असला तरी दोन्ही नेते एकमेकांना चिमटा काढण्याची संधी कधीच सोडत नाहीत. अशाच एका कार्यक्रमात गुलाबरावांनी आपल्या नेहमीच्या खान्देशी बाजाच्या शैलीत गिरीश महाजनांवर फटकेबाजी केली.

जळगाव येथील मातोश्री वृद्धाश्रमातील एका कार्यक्रमात ते बोलत होते. गिरीश महाजन यांच्यासमोरच त्यांच्यावर निशाणा साधला. कार्यक्रमात मंत्री गुलाबराव पाटलांनी मनोगत व्यक्त करताना मंत्री गिरीश महाजनांकडे पाहत विनोदी शैलीत जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे महाजनांनाही हसू आवरता आले नाही.

ते मोठ्या खात्याचे मंत्री आहेत...

गिरीशभाऊंना नेहमी मोठ-मोठी खाते मिळतात. ते मोठ्या खात्याचे मंत्री आहेत, याचे मला काय घेणं-देणं नाही, पण मी गिरीशभाऊपेक्षाही मोठा आमदार आहे. कारण मी ज्या मतदारसंघात राहतो, त्या ठिकाणी कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ आहे. या ठिकाणी जैन उद्योग समूहाच्या दोन कंपन्या आहेत. केशव स्मृती प्रतिष्ठानसुद्धा माझ्याच मतदारसंघात आहे. त्यामुळे मी स्वतःला मोठा आमदार समजतो," असे गुलाबराव पाटील म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. उपस्थितांमध्ये हस्याचे फवारे उडाले.

गुलाबभाऊ, तुम्ही अडीच वर्षे वाया घालवली...

गुलाबराव पाटील जेव्हा शिंदे गटात आले, त्यावेळी एका कार्यक्रमात महाजनांनी त्यांना टोला लगावला होता. महाजन म्हणाले होते की गुलाबभाऊ, तुम्ही अडीच वर्षे वाया घालवली. पण देर आये दुरुस्त आये, काही हरकत नाही. एकाच ठिकाणी दोन मंत्री असले की कसे चालते हे सर्वांना माहिती आहे, पण आमच्यामध्ये चांगला समन्वय आहे. याचा फायदा जिल्ह्याला कसा होईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT