Trible Devolopment Minister Ashok Uike Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Tribal Students Politics: विद्यार्थ्यांपुढे मंत्री हतबल तर पोलीस आले रडकुंडीला; सर्वात वर्दळीच्या महामार्गावर आठ तास सरकार जणू गायब... काय आहे प्रकार?

Minister Helpless in Student Protest: धक्कादायक, नाशिकला आठ तास सर्वात वरदळीचा महामार्ग ठप्प पोलीस आणि सरकार झाले गायब!

Sampat Devgire

Traffic Mismanagement Incident: नाशिकला सोमवारी झालेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची राज्यभर चर्चा आहे. आंदोलनाने आदिवासी मंत्री अक्षरशः घायाळ झाले. हजारो नागरिक तासन् तास महामार्गावर अडकून पडले. या काळात अक्षरशः जणू सरकारच अस्तित्वात नसल्यासारखे चित्र होते.

आदिवासी शिक्षक भरतीचा प्रश्न गेली अनेक वर्ष शासनाकडून रखडवण्यात आला आहे. याबाबतचा निर्णय झाल्यावर देखील केवळ आदिवासी शिक्षकांच्या नियुक्ती या थांबविण्यात आल्या. त्यामुळे आदिवासी आश्रम शाळा आणि अन्य शिक्षण संस्थांचा कारभार ठप्प झाला आहे.

या संदर्भात आदिवासी विकास मंत्री आणि भाजप नेते अशोक उईके यांनी कंत्राटी पद्धतीने तसेच खाजगी संस्थेच्या मार्फत भरतीचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचा प्रचंड विरोध आहे. हा विरोध काल नाशिकमध्ये प्रकट झाला आणि सबंध प्रशासन ठप्प झाले.

मालेगावहून चालत निघालेल्या या विद्यार्थ्यांनी मुंबईला बिरहाड मोर्चा काढला होता. योगायोग म्हणजे सोमवारीच आदिवासी विकास मंत्री देखील नाशिकच्या दौऱ्यावर होते. आदिवासी मंत्री यांची भूमिका विद्यार्थ्यांना मान्य नसल्याने त्यात मागील तेल ओतण्याचा प्रकार घडला.

हा मोर्चा नाशिक शहराजवळ दहावा मैल येथे आल्यावर अचानक विद्यार्थ्यांनी रस्त्यावरच बसून घेत रस्ता रोको केला. मुंबई आग्रा हा अत्यंत वर्दळीचा आणि वाहतूक असलेला मार्ग आहे. विद्यार्थ्यांनी ठाण मांडल्याने नाशिककडे येणारी वाहतूक ठप्प झाली. सकाळी अकराला सुरू झालेली ही कोंडी सायंकाळी सात पर्यंत कायम होती. हजारो वाहने गर्दीत अडकल्याने त्यांना बाहेरही पडता येत नव्हते.

दिवसेंदिवस आंदोलन आणि धरणे हे दिखाऊ होत चालले आहे. विरोधी पक्ष आणि संघटनांना सरकारच्या दबावा पुढे नमावे लागते. त्यामुळे बहुतांशी आंदोलन प्रतिकात्मक स्वरूपात होता. पोलिसांनाही हे आंदोलन देखील तसेच वाटले आणि गोंधळ झाला. विद्यार्थ्यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत मागणी मान्य होईपर्यंत माघार घेणार नसल्याचे जाहीर केले.

विद्यार्थ्यांच्या या कठोर भूमिकेमुळे मुंबई आग्रा महामार्ग अलीकडच्या काळात पहिल्यांदा सलग आठ ते दहा तास ठप्प झाला. यावेळी आदिवासी विकास मंत्री उईके यांनी चर्चेला येण्याची विनंती केली. प्रारंभी विद्यार्थ्यांनी ती फेटाळून लावली. मागण्या मान्य कराव्यात या भूमिकेवर ते ठाम होते. मात्र काही मध्यस्थांनी विनंती केल्याने विद्यार्थी चर्चेला तयार झाले.

त्यानंतर आदिवासी विकास मंत्र्यांची विद्यार्थ्यांची चर्चा झाली. समाधानकारक तोडगा निघाला नाही. दोन दिवसात मुख्यमंत्र्यांची मुंबईत चर्चा करण्यात येईल. मागण्यांवर विचार होईल असे आश्वासन देण्यात आल्याने बिऱ्हाड आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले.

या आंदोलनाने आदिवासी विकास मंत्री आणि सबंध पोलीस यंत्रणा अक्षरशः घामाघुन झाली होती. आदिवासी विकास मंत्र्यांनी काही संघटनांच्या सांगण्यावरून सरकारला ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा केला. याबाबत सरकार ठाम असून कंत्राटी शिक्षकांची भरती करण्यात येईल असे ते म्हणाले.

या निमित्ताने आदिवासी विद्यार्थ्यांनी आपली ताकद दाखवून दिली. त्यामुळे राज्य शासन आता तरी आदिवासी संघटनांचे प्रश्न गांभीर्याने घेईल का? अशी चर्चा आहे. विशेष म्हणजे हजारो नागरिक वाहतूक कोंडीत अडकले. मात्र कोणतीही पोलीस आणि वाहतूक नियंत्रण यंत्रणा त्यांच्या मदतीला आली नाही. या कालावधीत सरकार आणि कायद्याचे राज्य अस्तित्वात आहे की नाही? असा प्रश्न संतप्त नागरिक करीत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT