Radhakrishna Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe : शरद पवार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात, आता सत्ता येतच नसते; मंत्री विखेंनी महाविकास आघाडीला डिवचलं

Radhakrishna Vikhe said that Mahavikas Aghadi will not come to power : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येत नसते. महाविकास आघाडीत एकवाक्यता राहिलेली नाही. त्यामुळे राज्यात महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे विश्वास भाजप नेते राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

Pradeep Pendhare

Ahmednagar News : "महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहिलेल नाही. ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झालेत. शरद पवार सातत्याने मुख्यमंत्र्याना भेटत आहेत. काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री पदाची अनेकांना स्वप्न पडू लागली आहेत. महाविकास आघाडीची शकलं होऊ लागली आहेत. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी महायुतीचीच सत्ता निश्चित येणार. योजनांमुळे सर्व बहिणींचा आशीवार्द महायुतीलाच मिळणार", असा विश्वास राज्याचे महसूल तथा अहमदनगर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त केला.

भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आहे. या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात योजना सुरू झाल्या. केवळ घोषणा नाहीतर अंमलबजावणी या सरकारने केली. त्याचा लाभ थेट जनतेपर्यंत पोचविण्या करीता महसूल पंधरवडा आयोजित केल्याचे सांगितले. तसंच राज्यात महायुती सरकारने शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. मुलीसाठी उच्चशिक्षण मोफत केले. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ जेष्ठ नागरिकांना मिळणार आहे. तसेच मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेकरीता राज्यातून कोट्यवधी लाभार्थींचे अर्ज दाखल झाल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले. जनतेच्या मनातील काम महायुती सरकार करत आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीचेच सरकार सत्तेत येणार, असा विश्वास देखील मंत्री विखे यांनी व्यक्त केला.

राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त करून महाविकास आघाडीत कोणतीही एकवाक्यता राहिलेली नाही. उध्दव ठाकरे काय बोलतात, याचे भान त्यांना राहिलेले नाही. औरंगजेब फॅन क्लबचे मेंबर झाले, असून शरद पवार (Sharad Pawar) मुख्यमंत्र्यांच्या भेटी वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये प्रत्येकजण मुख्यमंत्री पदाचा दावेदार झाल्याने त्यांचे स्वप्न मुंगेरीलाल के, ठरणार आहे, असा टोला मंत्री विखे यांनी लगावला. महायुती सरकार पारदर्शीपणे काम करीत असून भ्रष्टाचाराला कुठेही थारा नाही. राज्यात चार हजार तलाठ्यांना नियुक्तीपत्र दिली आहेत. पण तलाठी पदाच्या भरती प्रक्रियेवरून केवळ महसूल विभागाला आणि सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केल्याचा आरोप मंत्री विखे यांनी केला.

संगमनेर तालुक्यातील निमगावजाळी इथं महसूल दिनानिमिताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा प्रारंभ आणि दाखल्याचे वितरण मंत्री विखे यांच्या हस्ते झाले. प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे, कैलास कोते, मच्छिंद थेटे, रामभाऊ भुसाळ यांच्यासह कार्यकर्ते आणि लाभार्थी उपस्थित होते.

नगर जिल्ह्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी सहा लाख अर्ज दाखल झाले असून संगमनेर तालुक्यातून 88 हजार अर्ज दाखल झाले आहेत. लाडक्या बहिणींना रक्षाबंधनच्या दिवशी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. महायुतीच्या पाठिशी लाडक्या बहिणींचा आशीर्वाद निश्चित राहील, असा विश्वास व्यक्त करत फक्त योजना आपल्या महायुती सरकारची आहे. मात्र उड्या महाविकास आघाडीचे नेते मारत असल्याचा टोला विखे पाटील यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT