Ahmednagar Lok Sabha Result 2024 : पुत्र खासदार डाॅ. सुजय विखे यांच्या विजयासाठी विखे परिवारआज सकाळी-सकाळी पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाले. भाजप नेते मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजय होतील, असा विश्वास व्यक्त केला.
भाजप (BJP) नेते मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले, "नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील जनता महायुतीसोबत आहे. त्यामुळे सुजय विखे मोठ्या मताधिक्यांनी विजयी होतील. नगर जिल्ह्यातील महायुतीच्या दोन्ही जागा निवडून येतील. राज्यात महायुतीला 40 पेक्षा जास्त जागा मिळतील. देशातील जनतेने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आहे".
मराठा आरक्षणाचा काही परिणाम जाणवेल का? यावर राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) म्हणाले, "मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्यपद्धतीने न्याय दिला आहे. त्यामुळे त्याचा काहीच परिणाम लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांवर झाला नाही". राज्यातील दुष्काळाची धग कमी होऊन पाऊस-पाणी भरपूर पडू दे, असे साकडे राधाकृष्ण विखे यांनी विठुरायाला घातलं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एक्झिट पोलमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीच उमेदवार माजी आमदार नीलेश लंके आघाडीवर दाखवले आहे. महायुतीमधील भाजपचे उमेदवार खासदार सुजय विखे पिछाडीवर दाखवले गेले. एक्झिट पोलच्या या अंदाजानंतर नगर भाजपमध्ये सन्नाटा पसरला आहे. कोणीही पुढे येऊन प्रतिक्रिया द्यायला तयार नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पुढे येत पुत्र सुजय विखे यांच्या विजयाचे दावे करत आहेत. यामुळे विखे यंत्रणा नगरमध्ये एकटी पडल्याचे सध्याचे चित्र आहे. याशिवाय मंत्री विखे यांचा आत्मविश्वास देखील काहीसा डळमळीत झाला आहे. काही तासांवर निकाल आल्याने काहीशी घालमेल देखील पाहायला मिळत होती. सहाजिक विखे परिवार सुजय विखे यांच्यासाठी विजयाबाबत अस्वस्थ आहे.
मंत्रा राधाकृष्ण विखे परिवारासह आज सकाळीच पंढरपुरात दाखल झाले. अख्खा विखे परिवार विठ्ठल-रुक्मिणी चरणी लीन झाला. सुजय विखे यांच्यासाठी यावेळी साकडे घातल्याचे दिसले. विखे परिवाराच्या चेहरावर काहीसा तणाव होता. दर्शनानंतर तो काहीसा मावळल्याचे दिसले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.