Raj Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Raj Thackeray Tribal Protest: आदिवासी विकास भवनला आंदोलकांचा घेरा... बिऱ्हाड मोर्चेकरी संतापले, आता प्रश्न राज ठाकरेंच्या दरबारात!

Nashik Contract Worker Protest: आदिवासी विकास मंत्री आश्रमशाळांत कंत्राटी कामगार नेमण्यावर ठाम असल्याने बिऱ्हाड मोर्चा चिघळण्याची शक्यता.

Sampat Devgire

Tribal Agitation News: राज्यातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये दहा ते पंधरा वर्षे रोजंदारीवर काम करणाऱ्या शिक्षकांच्या नोकऱ्या संकटात आल्या आहेत. राज्य शासनाने या ठिकाणी कंत्राटी कामगार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गेले दहा दिवस नाशिकमध्ये बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे.

आदिवासी विकास मंत्री डॉ अशोक उईके यांनी राज्यातील आदिवासी आमदारांनाही जुमानले नाही. कंत्राटी कामगार नियुक्त करणारच अशी भूमिका मंत्री डॉ उईके यांनी घेतली आहे. आदिवासी विकास मंत्र्यांच्या या भूमिकेमुळे नाशिकला आदिवासी विकास भवन समोर बिऱ्हाड आंदोलन तीव्र झाले आहे.

गेल्या दहा दिवसांपासून नाशिकमध्ये राज्यभरातील आदिवासी कर्मचाऱ्यांचे बिऱ्हाड आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांनी आदिवासी विकास भवनला घेराव घातला आहे. त्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ५० आंदोलक आज मुंबईला रवाना झाले.

राज्यातील विविध आश्रम शाळा आणि अन्य संस्थांमध्ये गेले १० ते १५ वर्ष रोजंदारीवर शिक्षक आणि अन्य कर्मचारी काम करीत आहेत. त्यांना सेवेत कायम करण्याची मागणी सुरू आहे. मात्र आदिवासी विकासमंत्र्यांनी कंत्राटी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाने या कर्मचाऱ्यांचे भवितव्य अंधारात आहे.

या आंदोलनाला राज्यातील विविध आदिवासी मंत्री तसेच राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपली सहमती दाखवली आहे. आमदारांनी आदिवासी विकासमंत्र्याकडे शिष्टाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र कंत्राटी कामगार नियुक्तीवर मंत्री ठाम असल्याने हा प्रश्न चिघळला आहे.

आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे उडी घेण्याची शक्यता आहे. मनसे सरचिटणीस दिनकर पाटील यांनी याबाबत पक्षप्रमुख ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार ५० आंदोलक आज एका खाजगी बसने श्री ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

राज्य शासन प्रदीर्घकाळ नोकरीत असलेल्या आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी करून कंत्राटी कर्मचारी नियुक्त करणार आहे. या धोरणाबाबत अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यातून पोलिसांनी आपले बळ आणि दबाव वाढविल्याने हे आंदोलन चिघळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आज काय निर्णय होतो याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT