<div class="paragraphs"><p>Mukhtar Abbas naqvi</p></div>

Mukhtar Abbas naqvi

 

Sarkarnama

उत्तर महाराष्ट्र

केंद्राच्या विविध योजनांचा अल्पसंख्याकांना लाभ होतोय

Sampat Devgire

धुळे : नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा गरिबांना होत आहे. देशातील नऊ कोटी महिलांना उज्ज्वला (Ujjwala) योजनेचा लाभ देण्यात आला. त्यातील ३८ टक्के लाभार्थी अल्पसंख्याक तसेच ४४ कोटी जनधन खात्यांमध्ये ३२ टक्के लाभार्थीदेखील अल्पसंख्याक होते, त्यावरून मोदी सरकार ‘सबका साथ-सबका विकास’ धोरण यशस्वीपणे राबवत असल्याचे सिद्ध होते, असे प्रतिपादन केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी (Mukhtar Abbas naqvi) यांनी दोंडाईचा येथे केले.

दोंडाईचा नगर परिषदेच्या माध्यमातून दोंडाईचा येथे विशेष रस्ते दुरुस्ती योजनेतून दहा कोटी खर्चाचे काँक्रिट रस्ते, गरिबा कॉलनीत सामाजिक सभागृह, गरीब नवाज कॉलनीत खुल्या मैदानाचे लोकार्पण, शल्यचिकित्सक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर मार्ग नामकरण, जामा मशिदीजवळील एकता चौक कामाचे भूमिपूजन आदी विविध कार्यक्रमांसाठी मंत्री श्री. नक्वी आज दोंडाईचा येथे आले होते. सरकारसाहेब रावल अध्यक्षस्थानी होते.

मंत्री नक्वी म्हणाले, की नरेंद्र मोदी सरकारने देशातील ८० कोटी गरिबांना कोरोना काळापासून आजपर्यंत मोफत धान्य देण्याचा अभिनव उपक्रम सुरू ठेवला आहे. त्यामुळे गरिबांना मोठा आधार मिळाला आहे. मोदी सरकारच्या काळात दोन लाखांपेक्षा अधिक लोकांना हज यात्रेला जाण्याची संधी उपलब्ध झाली. हज यात्रेसाठी कोरोनामुळे अडचणी येत असल्या तरी यावर्षी परवानगी मिळावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

ते म्हणाले, कोरोनाकाळात देशात लॅबपासून तर व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, एन-९५ मास्क अशा कोणत्याही सुविधा नसताना देशाने लॉकडाउनमध्ये रात्रंदिवस काम करून या संकटाचा सामना केला. पंतप्रधान मोदी सतत वैज्ञानिकांशी संपर्कात राहून लस निर्माण करून आज देशातील नागरिकांचे लसीकरण करून घेतले असल्याचे श्री. नक्वी म्हणाले. विनाभेदभावाने आमदार रावल शहराचा विकास करत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्षा नयनकुवर रावल, खासदार डॉ. सुभाष भामरे, माजी मंत्री तथा आमदार जयकुमार रावल, उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, मुख्याधिकारी डॉ. प्रवीण निकम, जयअदितसिंह रावल, भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण महाजन, बांधकाम सभापती निखिल जाधव, अहमद शेख, प्रा. शेख आदी उपस्थित होते.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT