Mehboob Shaikh, NCP Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

सोशल मिडीयाद्वारे युवकांना भ्रमीत करणाऱ्या भाजपपासून सावध व्हा!

व्हॉट्‌सअ‍ॅप आणि फेसबुकवर आभासी विद्यापीठे स्थापन केली जात आहेत.

Sampat Devgire

शिरपूर : व्हॉट्‌सअ‍ॅप आणि फेसबुकवर (Social Media) आभासी विद्यापीठे स्थापन करून त्यांच्याद्वारे २०१४ नंतर भारत निर्माण झाला, असा भ्रामक प्रचार सुरू आहे. युवकांना भ्रमित करण्याचे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी युवा कार्यकर्त्यांनी (NCP) सज्ज व्हावे, अन्यथा आगामी पिढ्यांपासून खरा इतिहास दडविला जाण्याचा धोका आहे, असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी केले.

येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात गुरुवारी शरद युवा संवाद यात्रेंतर्गत युवक कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, सध्या युवकांना वस्तुस्थितीची जाणीव करून देण्याची गरज आहे. अन्यथा ही नवी पिढी जगापासून विभक्त होऊन त्यांचे नुकसान होईल.

मेहबूब शेख म्हणाले, की लोकशाहीत कोणालाही सत्तेचा गर्व टिकविता येत नाही. जनता सार्वभौम असते. भारतीय जनता पक्षाने शासकीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करून अनेकांचा दबावतंत्राने पक्षप्रवेश करून घेतला. मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटकात बहुमत असलेल्या पक्षांऐवजी भाजपचे सरकार रूढ केले, पण महाराष्ट्रात खासदार शरद पवार यांच्यामुळे त्यांचा डाव यशस्वी होऊ शकला नाही. १०५ आमदार निवडूनही त्यांना विरोधी पक्षात बसावे लागले. त्यामुळे आता राज्यातील भाजपेतर पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे. हिंदू-मुस्लिम, भारत-पाकिस्तान याशिवाय कोणताही मुद्दा त्यांना जनतेसमोर नेता येत नाही. हे अपयश राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी थेट जनतेसमोर निर्भीडपणे मांडावे, त्यासाठी गट, गण, बूथप्रमुख व सदस्य नेमावेत, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेश सरचिटणीस दिनेश मोरे अध्यक्षस्थानी होते. प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित शिसोदे, प्रदेश सरचिटणीस ललित बागूल, भूषण कटारिया, तालुकाध्यक्ष शिरीष पाटील, शहराध्यक्ष डॉ. मनोज महाजन, माजी तालुकाध्यक्ष रमेश करनकाळ, प्रशांत दोरीक, उद्योग आणि व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष धीरज सोनवणे, जिल्हा उपाध्यक्ष नीलेश गरुड, हेमराज राजपूत, युवक आघाडीचे तालुकाध्यक्ष आशिष अहिरे, कांतिलाल पाटील, संजय पवार, उदय जाधव, रामकृष्ण महाजन, प्रसाद पाटील, बलकुव्याचे सरपंच प्रा. प्रशांत चव्हाण, संजय पवार आदी उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT