Aamshya Padavi News  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aamshya Padavi News: नंदुरबार अमली पदार्थमुक्त जिल्हा? आमदार पाडवींनी पोलिसांचा दावा खोटा ठरवला; खुलेआम विक्री

Nandurbar Declared Drug Free District : संबंधित पोलिस अधीक्षकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न आमदार पाडवी यांनी उपस्थित केला आहे.

Mangesh Mahale

Nandurbar Political News: सामाजिक संस्था आणि पोलिसांनी केलेल्या जनजागृतीनंतर नंदुरबार जिल्हा नुकताच अमली पदार्थमुक्त घोषित करण्यात आला आहे. अमली पदार्थमुक्त घोषित होणारा नंदुरबार हा राज्यातील पहिलाच जिल्हा आहे. मोठा गाजावाजा करत नंदुरबार जिल्हा अमली पदार्थमुक्त घोषित करण्यात आला, पण जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थांची खुलेआम विक्री होत असल्याचा आरोप आमदार आमश्या पाडवी यांनी प्रशासन आणि पोलिसांवर केला आहे. (Latest Marathi News)

अक्कलकुवा तालुक्यातून सर्वाधिक मद्य वाहतूक होत आहे. अमली पदार्थ आणि दारू ही गुजरात राज्यात बंदी असतानादेखील मोठ्या प्रमाणात नंदुरबार जिल्ह्यातून जात आहे, पोलिस विभाग फक्त बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप आमदार पाडवी यांनी केला आहे. आमदार पाडवींनी याबाबत वारंवार पोलिस अधीक्षकांना तक्रार दिली होती, पण तरीही पोलिस विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. संबंधित पोलिस अधीक्षकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न आमदारांनी उपस्थित केला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात वर्षभरापासून पोलिसांनी अमली पदार्थमुक्त जिल्हा होण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक बैठका घेण्यात आल्या. ६३४ ग्रामपंचायतींमध्ये अमली पदार्थमुक्तीसाठी खास ठरावदेखील करण्यात आले होते. जिल्ह्यात आता एकही अमली पदार्थ विक्री-खरेदी, प्रचार, प्रसार होत नसल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. पण आमदार पाडवींनी पोलिसांचा हा दावा खोटा ठरवला आहे.

दुसरीकडे नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात कुपोषित बालकांची संख्या 23 हजार झाली आहे. जिल्हा रुग्णालयात अपूर्ण सुविधा आणि रिक्त पदांमुळे बालमृत्यूची संख्या वाढत असल्याचे समोर आले आहे, आमदार पाडवींनी याबाबत प्रश्नावर आवाज उठवला आहे.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT