मुक्ताईनगर : ''राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून मला वारंवार टार्गेट करुन त्रास देण्याचे काम केले जात आहे. त्यामुळे मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटून वस्तुस्थिती सांगणार आहे, आता बस झाले त्रास सहन करणे,'' असे शिवसेना आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) म्हणाले. ''खडसेंकडून महाविकास आघाडीमध्ये मीठाचा खडा टाकला जात आहे,'' असा आरोपही त्यांनी केला.
मुक्ताई मंदिरातील (Muktainagar)5 कोटी रुपयांच्या विकास कामाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यावर आमदार पाटील यांनी निशाणा साधला. ''सामान्य कुटुंबातील गरीब व्यक्ती आमदार झाल्याने खडसे वैफल्यग्रस्त झाले आहेत,'' असा घणाघात पाटलांनी यावेळी केला.
''मुक्ताईनगर, संत मुक्ताई मंदिर परिसराच्या विकासासाठी निधीला स्थगिती देण्याचा करंटेपणा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. आमदार खोटारडे आहेत. पाठपुरावा केल्याचे एक तरी पत्र दाखवावे,'' असे आव्हान माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी दिले आहे.
''गरीब कुटुंबातील सर्वसामान्य माणूस हा आमदार झाला हे खडसेंच्या जिव्हारी लागलं. नेहमी माझ्याविषयी बोलताना त्यांची जीभ घसरते. मीही महाविकास आघाडीचा एक घटक आहे आणि अशाप्रकारे महाविकास आघाडीच्या नेत्याने माझ्यावर टीका करत महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रकार चालू आहे. एकनाथ खडसे यांनी माझ्यावर टीका केली त्यांच्यावरून त्यांचे वैफल्य दर्शवते. 35 वर्षांपासून मतदारसंघात विकास खुंटला, मी विकास कामे करायला लागलो आणि त्यांना जिव्हारी लागले,'' अशी टीका चंद्रकांत पाटलांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.