mla chitra wagh we support anup agrawal dhule city assembly election 2024 
उत्तर महाराष्ट्र

Dhule City Assembly Election : उमेदवार अग्रवाल यांच्या पाठीशी रहा -आमदार चित्रा वाघ

महायुती सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहिण योजना ही विरोधक महाविकास आघाडीला सहन झालेली नाही.

सरकारनामा ब्यूरो

धुळे : महायुती सरकारने सुरू केलेली माझी लाडकी बहिण योजना ही विरोधक महाविकास आघाडीला सहन झालेली नाही. महायुती सरकार ही योजना बंद करणार नाही. याउलट महिला लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दरमहा २१०० रूपये जमा होऊ शकतील. त्यासाठी राज्यात पुन्हा महायुती सरकार यावे लागेल आणि अधिकाधिक मताधिक्यासाठी भाजप महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल, असे आवाहन आमदार चित्रा वाघ यांनी केले.

धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांच्या प्रचारार्थ महिला मेळावा झाला. उमदेवार अग्रवाल, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा आमदार चित्रा वाघ, उत्तर महाराष्ट्र प्रमुख माजी महापौर जयश्री अहिरराव, धुळे शहर प्रभारी आमदार मुकेश पटेल, शहर- जिल्हाध्यक्ष वैशाली शिरसाट, मायादेवी परदेशी, प्रतिभा चौधरी, प्रतिभा शिंदे, वैभवी दुसाणे, अरुण पवार, आरती पवार, ऊर्मिला पाटील, जयेश वावधे, वंदना थोरात, प्रभा परदेशी, मंगला पाटील, प्रिया कपोले, मोहिनी धात्रक, रंजना पाटील, नेहा अहिरराव आदी उपस्थित होते.

अग्रवालांना पाठबळ द्या

आमदार वाघ म्हणाल्या, की महाविकास आघाडी सरकारने अल्पसंख्यांकाचे तुष्टीकरण चालविले आहे. राज्यात लव्ह जिहाद फोफावला आहे. माताभगिनींची सुरक्षा धोक्यता आली आहे. त्यापासून संरक्षणासाठी भाजप महायुती सरकार, उमेदवार अनुप अग्रवाल निवडून येणे महत्त्वाचे आहे. माताभगिनींवर अन्याय झाला, तर त्यांच्या न्यायासाठी लढणारा हक्काचा भाऊ म्हणून उमेदवार अग्रवाल यांच्याकडे पाहावे. त्यांना कौल द्यावा.

राज्यापुढे संकट निर्माण केले

विधानसभा निवडणुकीत आपली लढाई ही चोरांबरोबर आहे. पंजा, मशाल आणि तुतारी असलेल्यांनी संकटग्रस्त कोविड काळात गरीबांना वाटायची खिचडी आणि बॅगांची चोरी केली, असा आरोप आहे. ऑल इंडिया उलेमा बोर्ड आणि पर्सनल बोर्डाने महाविकास आघाडीसमोर १७ अटीशर्ती ठेवल्या. पाठिंबा हवा असेल, तर आमच्या मागण्या मान्य करा, असे या बोर्डांनी सांगितले. त्या मागण्या महाआघाडीने मान्य करत महाराष्ट्रापुढे संकट निर्माण केल्याचाही आरोप आमदार वाघ यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT