MLA Mangesh Chavan News, Jalgaon Latest Marathi News
MLA Mangesh Chavan News, Jalgaon Latest Marathi News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

रायगडावर गेलेले आमदार मंगेश चव्हाण जमिनीवरच झोपले!

Sampat Devgire

चाळीसगाव : आमदार मंगेश चव्हाण (MLA Mangesh Chavan) यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या रायगड मोहिमेला तरुण शिवभक्तांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सुमारे २५ बसेसमधून गेलेले जवळपास पंधराशे शिवभक्त रायगडावरील शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याने भारावले होते. (Mangesh Chavan take a tour of 1500 citizens On the eve of Shivrajyabhishek day)

किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमदार मंगेश चव्हाण यांनी बसेसची व्यवस्था करुन दिली होती. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून या बसेसला भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी भगवी झेंडी दाखवून या मोहिमेचा शुभारंभ केला. (Jalgaon Latest Marathi News)

मोहिमेत सहभागी राज्य परिवहन महामंडळाच्या बसचालकांसह आगार प्रमुख व सहकाऱ्यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांची महाआरती करुन बसेसची सवाद्य मिरवणूकही काढण्यात आली.

यावेळी योगाचार्य वसंतराव चंदात्रे, प्रितमदास रावलानी, ज्येष्ठ विश्वास चव्हाण, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र राठोड, उद्योजक योगेश अग्रवाल, समता सैनिक दलाचे नेते धर्मभूषण बागूल, रयत सेनेचे संस्थापक गणेश पवार, मराठा सेवा संघाचे सुधीर पाटील, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष कपिल पाटील, आगार व्यवस्थापक संदीप निकम, पालिकेतील माजी गटनेते संजय रतनसिंग पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य दिनेश बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

रायगडावर क्षणभर विश्रांती...

आमदार मंगेश चव्हाण हे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी भल्या पहाटे रायगडावर पोहोचले. लोकप्रतिनिधी म्हणून कुठलाही बडेजाव न आणता, सामान्य शिवभक्ताप्रमाणे त्यांनी रायगड पायी सर केला. मोहिमेत सहभागी शिवभक्तांसोबतच बॅगेची उशी करत गडाच्या मातीवरच क्षणभर विश्रांती घेतली. त्यांचा गाढ व निवांत झोपेतील फोटो शिवभक्तांनी कॅमेऱ्यात कैद करुन सोशल मीडियावर शेअर केला असता, तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर श्रद्धा असणारी स्वाभिमानी, नीतीवंत, निर्व्यसनी युवा पिढी घडविण्यासाठी विधानसभा निवडणुकीपूर्वी २०१९ मध्ये चारशेहून अधिक तरुणांना रायगड वारी घडवून आणली होती. त्यावेळी पुढील काळात दरवर्षी किमान एक हजार तरुणांच्या कपाळी रायगडाची माती लावेल, असा संकल्प केला होता. मध्यंतरी कोविडमुळे दोन वर्षे यात खंड पडला. यावर्षी चाळीसगाव शहर व तालुक्यातील सुमारे पंधराशे तरुणांना यात सहभागी करता आले, याचा आनंद आहे.

- मंगेश चव्हाण, आमदार ः चाळीसगाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT