Manikrao Kokate & Bharat Kokate
Manikrao Kokate & Bharat Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shivsena: राष्ट्रवादीचे आमदार माणिकराव कोकाटेंचे भाऊ भारत कोकाटे शिवसेनेत!

Sampat Devgire

सिन्नर : सिन्नर (Sinner) विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांचे लहान बंधू सोमठाणेचे सरपंच भारत कोकाटे (Bharat kokate) तसेच सोनांबेचे सरपंच डॉ. रवींद्र पवार माजी आमदार राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thakre) यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’ येथे पक्षप्रवेश करणार आहेत. (Sinner politics will more interesting in Kokate family)

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे आणि सोमठाणे येथील सरपंच व त्यांचे भाऊ भारत कोकाटे यांच्यात गेले काही दिवस राजकीय वितुष्ट निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी आमदार कोकाटे यांच्या विरोधात पॅनेल करून निवडणूक जिंकली. सोसायटी गटात देखील दोन्ही भाऊ परस्परांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यात निकालामध्ये गैरप्रकार झाल्याचा आरोप भारत कोकाटे यांनी केला होता. त्याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

यानिमित्ताने सिन्नर तालुक्याचे राजकारण अ धिक रंगतदार होणार आहे. आमदार कोकाटे यांना घरातूनच आव्हान मिळाल्याने त्याचा स्थानिक राजकारणावर काय परिणाम होतो, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. यानिमित्ताने शिवसेनेचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या गटाला त्याचा लाभ होईल.

सिन्नरच्या सोमठाणे व शिवडे गटातील विविध गावातील सरपंच, माजी सरपंच, अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी संचालक तसेच शेकडो कार्यकर्ते तसेच सिन्नर विधानसभा मतदारसंघातील भारत कोकाटे यांच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे. या वेळी नाशिक लोकसभा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, शिवसेना नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर, राजाभाऊ वाजे, तसेच तालुक्यातील सर्व आजी-माजी लोकप्रतिनिधी, शिवसेना, युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित राहतील.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT