Adway Hirey Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

मराठा आमदार, मंत्र्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे अन्यथा राजीनामे द्यावेत!

मालेगाव येथील सहविचार सभेत भाजप नेते अद्वय हिरे यांचे मराठा समाजाच्या आमदार, खासदार व मंत्र्यांना आवाहन.

Sampat Devgire

मालेगाव : सकल मराठा समाजाच्या (Maratha reservation) आरक्षणासह प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) २६ फेब्रुवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मराठा समाजाचे आमदार, खासदार व केंद्र तसेच राज्यातील मंत्र्यांनी उपस्थित रहावे. महाराजांच्या चरणी नतमस्तक होवून त्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात अन्यथा आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, असे आवाहन अद्वय हिरे (Adway Hire) यांनी समाजाच्या सहविचार सभेत केले.

श्री. हिरे म्हणाले, की राज्यातील कोणत्याही पक्षीय सरकार मराठा समाजाच्या आमदारांशिवाय होत नाही, हे वास्तव आहे. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणासह रास्त मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उपोषणास बसत आहेत, ही समाजाच्या लोकप्रतिनिधींसाठी लाजीरवाणी बाब आहे. सकल मराठा समाजाने मतदान केलेल्या लोकप्रतिनिधींना जाब विचारावा. त्यांना छत्रपतींच्या उपोषणात सहभागी होण्यास भाग पाडावे.

समाजाच्या मागण्या पदरात पाडून घ्याव्यात, अन्यथा संबंधित लोकप्रतिनिधींचा राजीनामा घ्यावा. सकल मराठा समाज बांधवांनी आझाद मैदानात जनसंख्येचा महापूर आणावा. रेल्वे, गाड्या व मिळेल त्या वाहनांनी मुंबई गाठावी, पोलिस प्रशासन जर आडकाठी घालत असेल तर त्या ठिकाणी रस्ते जाम करावेत. नाशिक येथील जिल्हा समन्वय बैठकीत जिल्ह्यातील एकही मराठा आमदार- खासदार उपस्थित नव्हता, ही खेदाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ओबीसी आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते. तरीही राज्य सरकारने राजकीय फायद्यासाठी न्यायालयाचा आदेश झुगारुन राज्यपालांकडून अध्यादेशावर स्वाक्षरी घेऊन निवडणुकांत ओबीसी आरक्षण मंजूर करुन घेतले. त्याच धर्तीवर मराठा समाजाच्या आरक्षणाबाबात राज्य शासनाने सकारात्मक भूमिका घेऊन मराठा समाजास तत्काळ आरक्षण द्यावे, अन्यथा सकल मराठा समाज सरकार उलथवून टाकेल, असा इशाराही त्यांनी या वेळी दिला.

या वेळी प्रसाद हिरे, लकी खैरनार, दादा जाधव, अनिल पाटील, प्रा. जगदीश खैरनार, खगेश देसले, पवन ठाकरे, अमोल निकम, संदीप पाटील, निलेश कचवे आदींची भाषणे झाली. सहविचार सभेस सुनील गायकवाड, देवा पाटील, अरुण पाटील, भारत पाटील, रामदास सूर्यवंशी, रवी सूर्यवंशी, अनिल पाटील, चंदु शेलार, गणेश सोनवणे, मनोहर बच्छाव, आर. के. बच्छाव, साहेबराव वाघ, दादाभाऊ अहिरे, निलेश कचवे, अमित बच्छाव, सुरीतराम शेलार, भैय्यासाहेब देसले, दीपक देसले, विनोद बोरसे, दादाजी भदाणे, सतीश भामरे, मनोहर चव्हाण, डॉ. राजेंद्र ठाकरे आदिंसह समाज बांधव उपस्थित होते.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT