Dhangar Reservation Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dhangar Reservation: धनगर आरक्षणासाठी चौंडीत दहा दिवसांपासून उपोषण; सरकारचे दुर्लक्ष ? राम शिंदे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News: संसदेच्या विशेष अधिवेशनात महाराष्ट्रातील धनगर समाजाचा अनुसूचित जमाती (एस.टी.प्रवर्ग) आरक्षणासाठीचा वटहुकूम काढावा, या मागणीसाठी यशवंत सेनेच्यावतीने चौंडीमध्ये गेल्या १० दिवसांपासून आमरण उपोषण सुरु आहे. मात्र, अद्याप सरकारने या उपोषणाची दखल घेतली नाही.

आता याबाबत आमदार राम शिंदे हे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार व राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात पत्र देणार आहेत.

राज्य सरकारने या आमरण उपोषणाची अद्याप दखल घेतली नसल्याने धनगर समाजामध्ये तीव्र भावना व्यक्त होत आहेत. याचे पडसाद राज्यभर उमटताना दिसून येत आहेत. रास्ता रोको, आमरण उपोषण, धरणे आंदोलन राज्यभर होत आहेत.

नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची शुक्रवारी उपोषण कर्त्यांबरोबर ठरलेली नियोजित भेट ऐनवेळी रद्द झाल्यामुळे धनगर समाजाच्या असंतोषात भर पडली. त्यामुळे आता राम शिंदे हे सरकारचे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत पत्र देणार आहेत.

धनगर आरक्षणप्रश्री चौंडी येथे गेल्या १० दिवसांपासून आमरण उपोषण करणाऱ्या उपोषणकर्त्यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. यासंदर्भात उपोषणकर्त्यांची राज्य सरकारने तातडीने योग्य ती दखल घ्यावी, असे राम शिंदे यांनी पत्रात म्हटले आहे. धनगर आरक्षणप्रश्री चौंडीत सुरु असलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला राम शिंदेंनी आजही भेट देत उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

Edited by - Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT