MLA Shirish Choudhary News, Vishwajeet Kadam News, Jalgaon News
MLA Shirish Choudhary News, Vishwajeet Kadam News, Jalgaon News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

केळी उत्पादकांसाठी आमदार शिरीष चौधरींचे विश्‍वजित कदम यांना साकडे!

Sampat Devgire

रावेर : रावेर (Jalgaon) तालुक्यात मागील पंधरवड्यात नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना (Farmers) ताबडतोब भरपाई मिळावी म्हणून आमदार शिरीष चौधरी (Shirish Choudhary) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि कृषी राज्यमंत्री विश्‍वजित कदम यांची भेट घेऊन त्यांना साकडे घातले. (Raver`s Banana Growers hit by rain)

मुंबई येथे मंत्रालयात गुरुवारी सकाळी आमदार चौधरी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री दादा भुसे आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची भेट घेऊन त्यांना मतदारसंघातील वादळाने नुकसान झालेल्या केळीबाबत माहिती दिली.

गेल्या काही दिवसांत रावेर - यावल विधानसभा मतदारसंघात झालेल्या वादळामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतकऱ्यांचे केळीचे मळे उन्मळून पडले आहेत व प्रचंड आर्थिक हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी कोलमडून पडण्याची शक्यता आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून त्वरित पंचनामे करून मदतीचे प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचे आदेश आमदार चौधरी यांनी स्थानिक प्रशासनाला दिले आहेत.

प्रशासनाला आदेश देऊन देखील त्यावर न थांबता त्यांनी मुंबईत नेत्यांची भेट घेऊन त्यांना झालेल्या नुकसानीची कल्पना दिली व शेतकऱ्यांना त्वरित मदत उपलब्ध करून देण्याची विनंती केली.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT